Mumbai hoarding collapse : घाटकोपर पेट्रोल पंप अन् होर्डिंगमधून वर्षाला 50 कोटींची कमाई, मातोश्री, भांडुपचा हिस्सा किती? सोमय्या यांचा थेट आरोप

Ghatkopar hoarding collapse : घाटकोपर येथील घडलेल्या दुर्घटनेनंतर आता चौथा दिवस उजडला आहे. त्यानंतर शोधमोहीम सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या भल्या मोठ्या कटरच्या साहाय्याने या ठिकाणी लोखंड काढण्याचे काम सुरु आहे. अद्याप त्या होर्डिंगचे दुसरे गर्डर काढण्याच काम सुरु आहे.

Mumbai hoarding collapse : घाटकोपर पेट्रोल पंप अन् होर्डिंगमधून वर्षाला 50 कोटींची कमाई, मातोश्री, भांडुपचा हिस्सा किती? सोमय्या यांचा थेट आरोप
Mumbai hoarding collapse
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 8:52 AM

घाटकोपर येथील छेडा नगरमध्ये सोमवारी दुर्घटना घडली होती. या ठिकाणी पेट्रोल पंपावर असलेल्या १२० बाय १२० फुटांचे भलेमोठ होर्डिंग कोसळले होते. या घटनेस चार दिवस झाल्यानंतर मलाबा उचलण्याच्या काम पूर्ण झाले नाही. या घटनेत आतापर्यंत १६ जणांनी प्राण गमावले आहेत. या होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. घाटकोपर पेट्रोल पंप अन् होर्डिंगमधून वर्षाला 50 कोटींची कमाई होत होती. त्यात मातोश्रीचा आणि भांडुपचा हिस्सा किती होता? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे.

बेकायदेशीर रित्या पोलिसांच्या जागेवर दिला पेट्रोलपंप

घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगच्या जाहिरात फलकाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हौसिंग सोसायटीची आहे. परंतु 2020-2021 मध्ये तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारने बेकायदेशीररित्या LORD’S MARK INDUSTRIES LTD या खाजगी कंपनीला पेट्रोल पंप दिला. तसेच या जागेवर होर्डिंग लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मेडीया प्रा. लि. कंपनीला दिला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई ₹25 कोटी होती. तसेच होर्डिंगची वार्षिक कमाई ₹25 कोटी होती.

भावेश भिंडेने शिवबंधन बांधले होते

भावेश भिंडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्याला शिवबंधन बांधले होते. त्यामुळे पेट्रोल पंप आणि होर्डिंगमधून मिळणाऱ्या 50 कोटींतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडूपला किती पैसे येतात याचा हिशोब ध्यावाच लागणार असल्याचे किरटी सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

चौथ्या दिवशीही काम सुरु

घाटकोपर येथील घडलेल्या दुर्घटनेनंतर आता चौथा दिवस उजडला आहे. त्यानंतर शोधमोहीम सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या भल्या मोठ्या कटरच्या साहाय्याने या ठिकाणी लोखंड काढण्याचे काम सुरु आहे. अद्याप त्या होर्डिंगचे दुसरे गर्डर काढण्याच काम सुरु आहे. त्याखाली एक गाडी आणि त्यात काही लोक असल्याचा अंदाज एनडीआरए जवानांकडून वर्तवण्यात आला होता. तसेच पडलेल्या होर्डिंगच्या बाजूला असणारे दुसरे होर्डिंग काढण्याचे काम सुरु केले आहे.

Non Stop LIVE Update
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक
राऊतांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार...सामनातील दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक.
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज
हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या.. बावनकुळेंच राऊतांना चॅलेंज.
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका
कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे अधिकाऱ्याच्या निलंबनावर पवारांची टीका.
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार.
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस.