AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचारी, ज्यांच्या पत्नीचे निधन झाले असेल अशा पुरुष कर्मचाऱ्यांना तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली असेल अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा घेता येणार […]

एसटीच्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

मुंबई : मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचारी, ज्यांच्या पत्नीचे निधन झाले असेल अशा पुरुष कर्मचाऱ्यांना तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली असेल अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा घेता येणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत आहे, असे रावते म्हणाले.

एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात 6 ऐवजी 9 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करत असताना या महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. विशेषत: परिक्षेच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची जास्त गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

ज्यांच्या पत्नीचे निधन झाले असेल तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रावत यांनी दिली.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील. मुलाचे वय 18 वर्षाचे होईपर्यंत ही रजा घेता येईल. एका वर्षात 2 महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येईल. पहिल्या 2 ज्येष्ठतम मुलांकरिता ही रजा घेता येईल.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.