AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रस्थापितांच्या आघाडी सरकारकडून MPSC प्रश्नी फक्त तोंडाची वाफ, गोपीचंद पडळकरांचा आरोप

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

प्रस्थापितांच्या आघाडी सरकारकडून MPSC प्रश्नी फक्त तोंडाची वाफ, गोपीचंद पडळकरांचा आरोप
गोपीचंद पडळकर
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 10:05 AM
Share

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या (MPSC Aspirants) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. प्रस्थापितांच्या राज्य सरकारनं (State Government) बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. विधानसभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

2019 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांना नियुक्तीसाठी झुरावं लागतंय

चार महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. 2019 साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळं अजूनही नियुक्तीसाठी झुरावं लागतंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

वयोमर्यादेवरुन टीकास्त्र

कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पानं पुसली असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही. त्यांच्या हेतूवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करतायेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सपांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपआमदार गोपीचंद पडळकर यांनी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आरोग्य विभागाच्या भरतीतील गैरप्रकारावरुन ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेतलीय.महाविकास आघाडी सरकार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

कोल्हापूरमध्ये केएमटीमध्ये तर साताऱ्यातही प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक, प्रशासन ॲक्शन मोडवर

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

Gopichand Padkalkar slam Thackeray Government over MPSC aspirants issue and Health Department Recruitment exam issues

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.