AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात, “एसटी कष्टकरी जनसंघा”ची स्थापना

शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक या भाषणामुळे भडकल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. जसे दिवस पालटतील तसे गुणरत्न सदावर्ते कायद्याच्या कचाट्याच आणखीच गुरफटत गेले. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीनही मिळाला. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.

Gunratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात, एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना
गुणरत्न सदावर्ते Image Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 3:32 PM
Share

मुंबई : गेली पाच महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचं (St Worker) सर्वात मोठं आंदोलन झालं. शेवटी हा संप चिघळला. मात्र या आंदोलनादरम्यान एक नाव आधी चांगलेच चर्चेत आणि नंतर वादात राहिलं ते वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचं. सुरूवातील या एसटीच्या संपाची सुरूवात झाली त्यावेळी यांचं नेतृत्व हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणि सदाभाऊ खोत यांनी केलं. मात्र नंतर या संपाचे नेतृत्व हे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे गेलं. गुणरत्न सदावर्ते हे एसटीच्या विलीनीकरणावर एसटी कामगारांसह ठाम राहिले. मात्र शेवटी कोर्टानेच एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देत कामार हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्याचदरम्यानचं सदावर्तेंचं एक भाषण वादात सापडलं. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक या भाषणामुळे भडकल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. जसे दिवस पालटतील तसे गुणरत्न सदावर्ते कायद्याच्या कचाट्याच आणखीच गुरफटत गेले. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीनही मिळाला. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज नव्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची घोषणा केली आहे.

नव्या संघटनेमार्फत कोणती भूमिका?

एसटी कर्मचारी कष्टकरी जनसंघ असे सदावर्तेंच्या नव्या एसटी कर्मचारी संघटनेचे नाव आहे. आता पुन्हा ते राज्य सरकारला टार्गेट करण्याची शक्यता आहे. या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी कमावल्याचे आरोपही करण्यात आले. या आरोपांमुळे आणि इतर झालेल्या केसेसमुळे गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई ते, सातारा, कोल्हापूर, असे अनेक दिवस कोठडीतही काढावे लागले. मात्र आता नव्या एसटी संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संघटनेशी कोणतीही संघटना जोडली जाऊ शकते. आम्हाला कोणत्याही संघटनेची अॅलर्जी नाही, त्यामुळे आरएसएसपासून सर्व संघटना या संघटनेशी जोडल्या जाऊ शकतात, असेही सदावर्ते यावेळी म्हणाले आहेत.

संघटनेत सर्वांचे मार्गदर्शन घेतले जाईल

कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कोणत्याही धर्माचे जातीचे लोक एकत्र येऊ शकतात. त्या सर्व अभ्यासकांचे स्वागत आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरेल. उच्च न्यायालयाने सांगतल्यानंतर जी संघटना आधी होती. तिची मान्यता आता संपली आहे. त्यामुळे त्या संघटनेचे आता कोणीही सभासद नाही. त्यामुळे आता नव्या संघटनेची गरज आहे. पुढील प्रश्न हे या संघटनेच्या मार्फत मार्गी लावण्यासाठी आता प्रयत्न होतील, असेही सदावर्ते या संघटनेच्या स्थापनेच्या घोषणेवेळी म्हणाले.

ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.