हज यात्रेसाठी नोंदणी सुरु, नियमावली जारी, नेमक्या अटी काय?

हज यात्रेसाठी नियमावली (Haj Yatra Guidelines) जारी करण्यात आली असून हज यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया सुरू असून 31 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

हज यात्रेसाठी नोंदणी सुरु, नियमावली जारी, नेमक्या अटी काय?
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: हज यात्रेसाठी नियमावली (Haj Yatra Guidelines) जारी करण्यात आली असून हज यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया सुरू असून 31 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. हज यात्रेसाठी तोपर्यंतअर्ज करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हज यात्रेला जाण्यासाठी काही विशिष्ट नियम असतात आणि त्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं.

हज यात्रेला जाण्यासाठीच्या अटी

हज यात्रेला जाण्यासाठी आधी अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर दिलेल्या क्रमांकाच्या आधारे नावं निवडली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर दस्तऐवजांसह 25 टक्के शुल्क जमा करावं लागतं. त्यानंतर हज कमिटी संबंधित व्यक्तीचा व्हिसा आणि तिकिटाची तजवीज करते. हज यात्रेला जाण्यासाठी सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे, ती व्यक्ती मुस्लिम असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ अन्य धर्मांतल्या व्यक्ती ही यात्रा करू शकत नाहीत. कोणत्याही वयोगटातली मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकते. परंतु, हज यात्रेला जाण्याकरिता अजून एक महत्त्वाची अट असते. ही अट म्हणजे, ज्या व्यक्तीवर कर्ज आहे, ती व्यक्ती हजला जाऊ शकत नाही. तसंच कर्जातून मिळालेले पैसे घेऊन व्यक्ती हजला जाऊ शकत नाही. तसंच त्या व्यक्तीकडे चुकीच्या मार्गानं मिळवलेले पैसे नसावेत.

हज यात्रा कधी असते

इस्लामिक कॅलेंडरनुसार, 12 व्या महिन्याच्या 8 ते 10 तारखेदरम्यान हज यात्रा असते. बकरी ईदपूर्वी काही दिवस हज यात्रा सुरू होते आणि बकरी ईदच्या दिवशी ही यात्रा पूर्ण होते. भारतातून अनेकजण हज यात्रेसाठी जात असतात. मुस्लिम धर्मामध्ये हज यात्रेला महत्त्वाचं स्थान आहे.

इतर बातम्या:

ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात, संजय राऊत यांची रोखठोक टीका

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी विरोधी पक्षनेत्यांची बैठक, सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार

 

haj yatra guidelines released and appeal for registration till 31 January check details here

Published On - 8:11 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI