5

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 27, 2019 | 5:46 PM

मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD prediction) ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1679.50 मिमी पाऊस

गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 679.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये झालाय.

पावसाची आकडेवारी 27 जुलै 2019

ठाणे – 160.00mm

कल्याण – 231.40mm

मुरबाड – 332.00mm

उल्हासनगर – 296.00mm

अंबरनाथ – 280.60mm

भिवंडी  – 185.00mm

शहापूर  – 195.00mm

विदर्भ मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाडा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. शिवाय विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला तरी धरणांमध्ये मात्र पाणीसाढ्यात वाढ झालेली नाही.

पुणे जिल्ह्यात मुसळधार

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात (Pune Rain) शुक्रवारपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे (Pune Rain) आळंदीमधील इंद्रायणी नदी (Indrayani River) दुथडी भरून वाहू लागली आहे. आंद्र आणि वडविळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागली. तर लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भुशी डॅमकडे जाणारा मार्गही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
'चप्पल घालत याचं मार्केटिंग झालंय', पवार अन् सुप्रिया सुळेंवर निशाणा
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेकडून चोप, अविनाश जाधव म्हणाले,
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
असं डोहाळे जेवण पाहिलंय का? ‘सुंदरी’च्या कार्यक्रमाची राज्यभरात चर्चा
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळ माजवली
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले 'सावध व्हा, चप्पल...
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी साहित्य प्रेमींनी गजबजणार
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...