AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठक ( Vikas Pathak) याला आज वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
हिंदुस्तानी भाऊला जामीन
| Updated on: Feb 05, 2022 | 5:50 PM
Share

मुंबई :  हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठक ( Vikas Pathak) याला आज वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी एक दिवसांची वाढ करण्यात आली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीसाठी हिंदुस्तानी भाऊच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student protest)चिथावल्याप्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

विद्यार्थी आंदोलनामुळे हिंदुस्तानी भाऊ सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. धारवीतलं आंदोलन भाऊला चांगलच भोवलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमा होत हजारो विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. या आदोलनाआधी हिंदु्स्तानी भाऊ आंदोलनस्थळी आला होता. त्याला पोलिसांनी तिथं थांबू दिलं नाही, मात्र हिंदुस्तानी भाऊ तिथून गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला. आंदोलनपूर्वीचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले. हे आंदोलन हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडिओंमुळे भडकले असल्याचा आरोप आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही या आंदोलमागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी वेगाने तपास करत हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठीडी संपल्याने त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली. आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?

हिंदुस्तानी भाऊ बाबत अनभिज्ञ असलेले मोजकेच नेटिझन्स असतील. विकास पाठक हा हिंदुस्तानी भाऊ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या

UP Elections | अखिलेश यादवांच्या नावे किती संपत्ती? जाणून घ्या बँक बॅलन्स, गाडी बंगला याविषयी सविस्तर!

विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या

Breaking : किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी, सोमय्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न!

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.