AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! धोक्याची घंटा, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाने..

बईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये. पुढील काही तास अतिमुळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

सावधान! धोक्याची घंटा, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाने..
Mumbai Rain
| Updated on: Aug 18, 2025 | 12:01 PM
Share

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये. पुढील काही तास अतिमुळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोकलची वाहतूक मंदावली आहे. पुढील काही तास अति धोक्याची असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने अगोदर ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, आता मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज, सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025  रोजी दुपारच्या सत्रात सुटी जाहीर केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. यासोबतच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916  या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरू आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.