Devendra Fadnavis : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपा आपल्याकडेच ठेवणार! गृह आणि अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 11 जुलैपूर्वी होईल, अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यात भाजपाच्या जुन्या चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. 11 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ शपथविधी तर 18 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे.

Devendra Fadnavis : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपा आपल्याकडेच ठेवणार! गृह आणि अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Jul 02, 2022 | 9:32 PM

मुंबई : राज्य सरकारमधील गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राहणार असल्याची माहिती टीव्ही 9ला सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्यास अजून अवधी आहे. बहुमतदेखील अद्याप सिद्ध झालेले नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार याचे कयास बांधले जात आहेत. पक्षादेश मानून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद (Deputy chief minister post) स्वीकारले खरे मात्र ते समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. भाजपासोबत फुटलेल्या शिवसेनेचा मोठ गट आलेला असला तरी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असणार आहे. पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आधीच्या कार्यकाळातही गृहमंत्रीपद होते फडणवीसांकडे

अर्थ आणि गृह ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सागर बंगल्याकडे वळत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त आणि महासंचालकांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्याची भाजपाची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या मागील सत्ताकाळातदेखील (2014-19) गृहखाते फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले होते, तर अर्थखाते सुधीर मुनगंटीवार म्हणजे भाजपाकडेच होते.

हे सुद्धा वाचा

नव्या चेहऱ्यांना संधी?

राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 11 जुलैपूर्वी होईल, अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यात भाजपाच्या जुन्या चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. 11 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ शपथविधी तर 18 जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे. आता नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या कोण आणि किती आमदारांना मंत्रिपदे मिळणार, याविषयी उत्सुकता आहे. तर आता केवळ औपचारिकता राहिली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे राहुल नार्वेकर अध्यक्षपदी निवडून येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपानेदेखीव विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें