नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला?, कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार? राजकीय वर्तुळात चर्चा

मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला होण्याची शक्यता

नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला?, कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार? राजकीय वर्तुळात चर्चा
आज शिंदे सरकारची बहुमत चाचणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 1:27 PM

मुंबई : राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी नुकताच पार पडला. पण कुठल्याही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. आता लवकरच मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. 4 किंवा 5 जुलैला हा शपथविधी पार पडेल, अशी माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांकडूम ही माहिती मिळतेय.

मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. आता लवकरच मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. 4 किंवा 5 जुलैला हा शपथविधी पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगरविकास आणि गृह खातं फडणवीसांकडेच

नव्या सरकारमध्ये फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे,. शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खातचं ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू, शंभुराज, सत्तारांना बढती

नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे फुल लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे.

पंकजा मुंडेंना स्थान मिळणार नाही?

दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

अपक्षांना संधी

शिंदे सरकारमध्ये ठरावीक अपक्षांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल. इतर अपक्षांना महामंडळांवर खूश केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.