जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय, SRA ची घरे विकण्याची मर्यादा घटवली

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. (SRA Jitendra Awhad)

जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय, SRA ची घरे विकण्याची मर्यादा घटवली
सांकेतिक फोटो

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा (SRA) अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी दिली. ते ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (house build under the SRA can be sell out after 5 years announced Jitendra Awhad)

ज्या नागिरकांना SRA अंतर्गत घरे मिळालेली आहेत त्यांना आपली घरं 10 वर्षांपर्यंत विकता येत नव्हती. तसा प्रयत्न केलाच तर घऱमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, यानंतर आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णया अंतर्गंत घर विकण्याची 10 वर्षींची मर्यादा 5 वर्षे करण्यात येणार आहे.

SRA तील घरं विकणाऱ्यांना नोटिसा

याविषयी अधिकची माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की. राज्य सरकार एसआरए अंतर्गत असलेल्या घरांना विकाण्याची कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी ही मर्यादा 10 वरुन 5 वर्षे केली जाईल. मात्र असे असले तरी सध्या 10 वर्षांच्या आत SRA तील घरं विकणार्‍यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत 27 तारखेला राज्य सरकार कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. मात्र, यानंतर SRA मधील घरं 5 वर्षांच्या कालमर्यादेनंतर विकता येणार आहेत,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या

म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार

SRA च्या 13 हजार बेकायदा रहिवाशांना 48 तासाची मुदत, पुरावे न दिल्यास घरं सोडावी लागणार

(house build under the SRA can be sell out after 5 years announced Jitendra Awhad)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI