मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे, अजय चौधरींची रोखठोक प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही . माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं. जितेंद्र आव्हाड यांना दोन पत्रं लिहिली पण दखल घेतली नाही, असं शिवसेना आमदार अजय चौधरी म्हणाले.

मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे, अजय चौधरींची रोखठोक प्रतिक्रिया
ajay chaudhary_Jitendra Awhad


मुंबई : एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, इकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत (Shiv Sena vs NCP) बिनसण्याचं चित्र आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला आहे. (Housing minister Jitendra Awhad ignored even after two letters Shiv Sena MLA Ajay Chaudhary complaints, Maharashtra CM Uddhav Thackeray stays on 100 Mhada flats to cancer kin patients )

कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरावा केला. पत्रं लिहिली, त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असं शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही . माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं. जितेंद्र आव्हाड यांना दोन पत्रं लिहिली पण दखल घेतली नाही. माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत, मी असाचं बोलत नाही. मला जितेंद्र आव्हाडांनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही. ज्यावेळी हा निर्णय झाला, त्यावेळी स्थानिक महिलांनी म्हाडाच्या सीईओना घेराव घातला होता, असं अजय चौधरी म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे, असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा ड्रीम प्रोजेक्ट

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

16 मे रोजी पवारांच्या हस्ते चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द

16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता.

300 चौरस फुटांची घरे

300 चौरस फुट असलेले 100 फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे.

VIDEO : अजय चौधरी काय म्हणाले? 

संबंधित बातम्या 

Breaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI