‘तो’ आमदार कोण? डीएनएवाला; प्रवीण दरेकर करणार विधानपरिषदेत पोलखोल

आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि नंतर संजय राठोड यांचं प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. (i will expose another mahavikas aghadi mla today in house says pravin darekar)

  • राहुल झोरी, हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:18 AM, 3 Mar 2021
'तो' आमदार कोण? डीएनएवाला; प्रवीण दरेकर करणार विधानपरिषदेत पोलखोल
Pravin Darekar

मुंबई: आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि नंतर संजय राठोड यांचं प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टची मागणी आज विधानपरिषदेत करणार असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा आमदार कोण? याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. (i will expose another mahavikas aghadi mla today in house says pravin darekar)

प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केला आहे. आघाडीच्या एका आमदाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. आघाडीच्या एका आमदाराची डीएन टेस्ट करण्याची कोर्टात मागणी आहे. या आमदाराची पत्नी आणि अपत्य बाहेर आहे. या आमदाराने त्याच्या मुलाला मारहाणही केली आहे. त्यामुळे या आमदाराची चौकशी करावी आणि त्याची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे, असं दरेकर यांनी सांगितलं.

हा आमदार कोण?

दरम्यान, दरेकर यांनी आरोप केलेला हा आमदार कोण? असा सवाल केला जात आहे. हा आमदार महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा आहे? त्याचं नेमकं काय प्रकरण आहे? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरेकरांच्या आरोपानंतर कोणत्या पक्षाची कोंडी होणार? याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राज्यपालांकडे राजीनामा पाठवा

दरम्यान, वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीम्यावरून दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. संजय राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. त्यांनी राजीनामा राज्यपालांना राजीनामा द्यावा. राजीनाम्याचं केवळ नाटक चालू आहे. या नाटकाचा हा पहिला अंक आहे की दुसरा अंक आहे माहीत नाही, असंही दरेकर म्हणाले. तर, राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत. त्यामुळेच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे अद्याप पाठवण्यात आलेला नाही, अशी खोचक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच आमदार संजय कुटे यांनीही राठोड यांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का? असा सवाल कुटे यांनी केला. (i will expose another mahavikas aghadi mla today in house says pravin darekar)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

(i will expose another mahavikas aghadi mla today in house says pravin darekar)