AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मी मंत्रिपद सोडेन, समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका अन् खुलं आव्हान!

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

...तर मी मंत्रिपद सोडेन, समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांची जाहीर भूमिका अन् खुलं आव्हान!
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई :  ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवून त्यांना अक्षरश: घायाळ करुन सोडलंय. मी केलेले सगळे आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी जाहीर केली आहे.

वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

माझे आरोप खोटे ठरवून दाखवा, मलिकांचं वानखेडे कुटुंबियांना आव्हान

मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असं आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.

समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने IRS ची नोकरी मिळवली

मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असं ट्विट करत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडेंनी फसव्या मार्गाने नोकरी मिळवल्याचा मलिक यांनी म्हटलं आहे.

समीर आणि डॉ. शबाना कुरेशी निकाहाचा फोटो मलिकांकडून ट्विट

तसंच एका तासापूर्वी मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो प्रदर्शित केला आहे, जो डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत निकाह केल्याचा आहे. म्हणजेच मलिक वारंवार हेच स्पष्ट करु इच्छित आहे की समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत.

हे ही वाचा :

महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागलंय का? पत्नी क्रांती रेडकरचं बेधडक उत्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.