AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्यात 120 वर्षांचा रेकॉर्डब्रेक पाऊस

मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1908 मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानतंर 112 वर्षांनी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई-पुण्यात 120 वर्षांचा रेकॉर्डब्रेक पाऊस
| Updated on: Jul 30, 2019 | 1:19 PM
Share

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई, पुण्यासह, राज्यात मुसळधार पावसाने ( monsoon rain) सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे ( monsoon rain) पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीतही चांगली वाढ  झाली आहे. मात्र जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या पावसाने 5 किंवा 10 नव्हे तर तब्बल 112 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पुणे हवामान विभागाने टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1908 मध्ये सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानतंर 112 वर्षांनी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ठाणे आणि पुणे या शहरातही 118 वर्षांनी जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 1901 मध्ये अशाप्रकारे विक्रमी पाऊस झाला होता.

मुंबईत 1907 मध्ये जुलै महिन्यात 1500 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी 28 जुलैपर्यंत मुंबईत सरासरी 1 हजार 492 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही वर्षातील पावसाच्या आकडेवारी तुलना केल्यास मुंबईत जुलै महिन्यात केवळ 8 मिमी पाऊस पडला तर 1907 मधील पावसाचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानतज्ज्ञ पुलक गुहाथाकुर्ता यांनी दिली.

तर पुणे आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये 28 जुलैपर्यंत अनुक्रमे  827.7 मिमी आणि 1975.6 मिमी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 118 वर्षात जुलै महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मुंबईसह राज्यात 1 जुलैपासून 12 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. असेही हवामानतज्ज्ञ पुलक गुहाथाकुर्ता यांनी सांगितले. याआधी 10 दिवसात एखाद्या दिवशी मुसळधार पाऊस पडायचा. मात्र यंदाच्या वर्षी असे न घडता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कायम पावसाची रिमझिम सुरु होती असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतीला कुलाबा, सांताक्रुझ, विक्टोरिया गार्डन (राणीबाग), जुहू, वरळी पोद्दार शाळा या परिसरातील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाची सरासरी नोंद काढण्यात आली आहे. पावसाच्या सरासरी नोंदीनुसार, याआधी जुलै 2016 मध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली होती. तर पुणे आणि ठाणे शहरातही जुलै 2016 मध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान सध्या मान्सूनच्या वारे दक्षिणेकडे सरकत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह इतर ठिकाणी अशाचप्रकारे पाऊस होण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.