AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना, आरपीआयचं शिष्टमंडळ गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला

दलित अत्याचार रोखण्याकडे महाविकास आघाडी सरकारने अधिक लक्ष द्यावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

राज्यात दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना, आरपीआयचं शिष्टमंडळ गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला
Dilip Walse Patil
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 4:29 PM

मुंबई : महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दलित अत्याचार रोखण्याकडे महाविकास आघाडी सरकारने अधिक लक्ष द्यावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. (Increasing incidence of Dalit atrocities in state, RPI delegation meets Home Minister Dilip Walse Patil)

केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज गृहमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रवीण मोरे, सचिन आठवले आणि सतीश निकाळजे यांचाही समावेश होता.

महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून राज्यात 200 हून अधिक दलित अत्याचाराची प्रकरणे घडली आहेत. नुकतेच परभणी येथील खेरडा गावात दलितांना पिण्याचे पाणी देण्यास नकार देऊन शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास जातीवाचक अश्लील शिवीगाळ करण्याचा प्रकार समाज माध्यमांत उघडकीस आला आहे.

दलितांवर होणारे हे अत्याचार रोखावेत. दलितांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आणि प्रवीण मोरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन केली आहे.

पदोन्नती, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आठवले शरद पवारांना भेटणार

पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गंभीर इशारा रामदास आठवले यांनी दिला.

इतर बातम्या

VIDEO: दरेकर, महाजनांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून घ्या!

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

(Increasing incidence of Dalit atrocities in state, RPI delegation meets Home Minister Dilip Walse Patil)

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.