भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय
भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ले केले. यात पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारतीय हवाई दलाने तो परावृत्त केला. भारताने लाहोरमधील संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त केल्या. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे आणि काही भागांमध्ये सावधगिरीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलाने तो हाणून पाडला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केली. या पार्श्वभूमीवर सध्या भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच सीमालगत भागात सावधगिरी बाळगली जात आहे.
भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
काश्मीरमधील शाळा बंद
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर लक्ष्य साधले जात आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बारामूला आणि कुपवाडा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच श्रीनगर आणि अवंतीपोरा विमानतळाजवळील शाळा ९ आणि १० मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.