ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार?, नारायण राणेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

राज्यातील ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार का? या प्रश्नावर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. (is maha vikas aghadi government collapse? what narayan rane says)

ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार?, नारायण राणेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
narayan rane


मुंबई: राज्यातील ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार का? या प्रश्नावर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार कोणत्याहीक्षणी जाईल. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर थेट हल्लाबोल केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.

माझ्या आयुष्यात असा मुख्यमंत्री पाहिला नाही

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटला जात नाहीत. मंत्रालयात जात नाही. काय काम करायचं तेही माहीत नाही. पण नको त्या विषयावर बोलतात. हे काय मुख्यमंत्री आहेत का? माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. मातोश्रीत बसूनच सर्व काम होतात. महाराष्ट्र पाहा किती प्रगती केली आहे. लोकांच्या हिताचं एक तरी काम केलं का? अशी फटकेबाजीही त्यांनी केली.

भ्रष्टाचार केला तर चौकशी करू नये का?

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्याबाबर राणेंना विचारलं असता, कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि यंत्रणांना माहिती मिळत असेल तर चौकशी करू नये का? त्या संस्था कशासाठी आहेत? त्यांनी जे काम केलं. त्यात काही सापडलंच ना. संपूर्ण आयुष्यभर नोकरी केली तर पाच दहा लाखाच्या पलिकडे मिळत नाहीत. हे लोकं सीआरमध्ये (कोटीत) खातात, घेतात आणि ठेवतात. त्यामुळे पकडले गेले. चोरी केल्यानंतर सर्वच जण बोंब मारतात. मी काहीच केलं नाही सांगत असतात. अरे चोरी केली की नाही ते सांगा ना? असा सवालही त्यांनी केला. अनिल देशमुख यांच्यानंतरही अजून अनेक जण लाईनमध्ये आहेत. तुरुंग खाली करण्याचं काम सुरू आहे. सर्वजण येतील हळूहळू असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल, तेव्हा बोंबलू नका; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

(is maha vikas aghadi government collapse? what narayan rane says)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI