सामान्यांसाठी पश्चिम रेल्वे 29 जानेवारीला सुरु होणार? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल मेसेजचा अर्थ

या आदेशाची प्रत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. लोकल सेवा सुरु होणार या बातमीने अनेकांना आनंदही झाला होता. | local train in Mumabi

सामान्यांसाठी पश्चिम रेल्वे 29 जानेवारीला सुरु होणार? जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजचा अर्थ
Mumbai local train
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:29 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पश्चिम रेल्वेची (Western Railway) सेवा 29 जानेवारीपासून सामान्य लोकांसाठी खुली होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत रेल्वेच्या आदेशाची एक प्रतही जोडली आहे. त्यामध्ये 25 जानेवारीला पश्चिम रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला विनंती प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आम्ही 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेची संपूर्ण सेवा सुरु करण्याची परवानगी देत आहोत, असे आदेशात नमूद करण्यात आले होते. (When will Mumbai suburban railway starts?)

त्यामुळे या आदेशाची प्रत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. लोकल सेवा सुरु होणार या बातमीने अनेकांना आनंदही झाला होता. या पार्श्वभूमीवर आता पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरु होणार याचा अर्थ ती सामान्यांसाठी खुली होणार, असा नव्हे.

सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवल्या जातील. त्यामुळे पश्चिम रेल्वेची संपूर्ण सेवा सुरु होणार याचा अर्थ ती सामान्यांसाठी खुली होणार, असा काढण्यात येऊ नये, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनच्या निर्णय दिल्लीतूनच होणार

सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळेल.

संबंधित बातम्या:

Mumbai Local Train Latest Update | लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

(When will Mumbai suburban railway starts?)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.