नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ, मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव गायब?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची फुलझडी लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. (jaideep rana name drop from mumbai river anthem video?)

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ, मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव गायब?
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची फुलझडी लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मलिकांनी केला होता. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहेत, असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

फडणवीसांनी आरोप फेटाळले

मलिक यांच्या या आरोपानंतर फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. इतकेच नाही तर राणाशी माझा काहीच संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. मलिकांनी चार वर्षापूर्वीचा फोटो ट्विट केला आहे. रिव्हर मार्च ही संघटना आहे. त्यांना रिव्हर अँथमवर गाणं करायचं होतं. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला आहे. चौगुले म्हणून आहेत. त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो. माझी पत्नीही त्यांना मदत करत होती. त्यांनी गाणं तयार केलं होतं. त्यावेळी हे फोटो काढले होते. माझ्याही सोबत फोटो काढले आहे. पण मलिक यांनी जाणीवपूर्वक पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे, असं सांगतानाच मलिक यांनी माझा फोटो ट्विट केला नाही. कारण माझ्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याबरोबरचा फोटो ट्विट केला असता तर आरोप फुसका ठरला असता, असं फडणवीस म्हणाले.

नावच वगळलं

दरम्यान, मलिक यांच्या आरोपानंतर युट्यूबवरील मुंबई रिव्हर अँथम साँगमधून जयदीप राणा याचं नाव श्रेयनामावलीतून वगळल्याचं दिसत आहे. मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये राणाचं नाव होतं. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर हे नाव ववगळण्यात आलं आहे. अचानक हे नाव वगळण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

संबंधित बातम्या:

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

Maharashtra News LIVE Update | मलिकांनी लवंगी लावला, दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार – देवेंद्र फडणवीस

(jaideep rana name drop from mumbai river anthem video?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI