AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’

Kalyan Crime News: अचानक दोघेजण आले तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. त्या दोघांनी माझ्या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली. दोघ तरुण मुले होती. मी खाली पडलो. त्यांनी सहा ते सात वेळा माझ्यावर सिमेंटचे ब्लॉक मारुन फेकले.

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, 'म्हणून मी वाचलो...'
हेमंत परांजपे
| Updated on: Dec 22, 2024 | 9:21 PM
Share

कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनांबद्दल पोलीस प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला. आरोपींना 12 तासांत पकडले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हेमंत परांजपे यांनी घटनेची आपबिती सांगितली.

अन्यथा मी जिंवत नसतो..

हेमंत परांजपे यांनी सांगितले की, मी लग्न समारंभामध्ये गेलो होतो. आमच्या ओळखीच्या माणसाने मला घराजवळ सोडले. अचानक दोघेजण आले तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. त्या दोघांनी माझ्या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली. दोघ तरुण मुले होती. मी खाली पडलो. त्यांनी सहा ते सात वेळा माझ्यावर सिमेंटचे ब्लॉक मारुन फेकले. ते सगळे फेवर ब्लॉक मी माझ्या पायावर घेतले. जर ते डोक्याला लागले असते तर मी जिवंत नसतो. हे कोणी केले ते सर्व माझ्याकडे पुराव्याने येणार आहे. मात्र हे सगळे राजकारणामुळे झालेले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

हेमंत परांजपे यांनी सांगितले की, राजकारणात गेल्या 48 वर्षांपासून मी काम करत आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरोधात राहिलो. त्याची फळ आणि त्याचे फायदे अशा प्रकारे मिळत आहे. राजकीय हेतूने प्रेरित ही घटना आहे. आगामी मनपा निवडणुका आहेत. कल्याणमध्ये मी सीनियर असल्यामुळे भाजपचा उपाध्यक्ष आहे. मी कधी कोणाचा एक रुपया घेतला नाही. माझे कोणाशी भांडण झाले नाही. हा प्रशासनाचा असलेला ढिसाळपणा आहे. लवकरच बरा झाल्यावर मी गृहमंत्री देवा भाऊ यांना भेटायला जाणार आहे.

हल्ल्यामागे पक्षातील अंतर्गत वाद

माझ्या मारहाणीची बातमी देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत गेली असल्याचे हेमंत परांजपे यांनी सांगितले. त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य रीतीने तपास करण्याचे सांगितले देखील आहे. राज्यातील लोकसंख्या पाहता प्रत्येक ठिकाणी पोलीस संरक्षण देऊ शकत नाही. माझ्यावर झाला झाला असला तरी मी भारतीय जनता पक्षाला दोष देणार नाही. मात्र पक्षांमध्ये असलेली ही धूसपुस हे या घटनेला कारणीभूत आहे. हे 100 टक्के आहे. भाजपच्या अंतर्गत वादाने हा हल्ला झाला आहे.

हल्लासंदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज मी दिलेली आहे. अजून चार फुटेज मी देणार पोलिसांना देणार असल्याचे हेमंत परांजपे यांनी सांगितले. ते म्हणाले, मी प्रशासनाला मदत करत आहे. पोलीस निश्चितपणे याच्यात लक्ष देऊन खरे आरोपी शोधून काढतील.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.