BMC Election 2026: माझं घर तोडणाऱ्यांना…मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना झटका, कंगणा राणौतची जळजळीत प्रतिक्रिया
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रतिक्रियांचा पूर येत आहे. त्यात सिनेअभिनेत्री कंगना राणौतची तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या पीछेहाटीवर तिने जळजळीत प्रतिक्रिया दिली.

Kangana Ranaut on BMC Election 2026: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला ढासळला. 25 वर्षांच्या सत्तेला भाजपने पहिल्यांदाच सुरूंग लावला. उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा बुरूज ढासळला. आता मुंबईत भाजपचा महापौर होणार आहे. शिंदे सेनेची त्याला साथ असेल. या सत्ता परिवर्तनावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. त्यात सिनेअभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतची जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना कंगना राणौतने पंगा घेतला होता.
माझं घर तोडणारे…
Municipal Election 2026
Maharashtra Election Result 2026 : पुण्यात आमदारांच्या पुढील पिढीला महापालिका निवडणुकीत 50 टक्के यश
धाराशिव - सावंत काका पुतण्याचं बिनसलं , धनंजय सावंत जिल्हापरिषदेला वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत
Mumbai Election Result 2026 : मुंबईचा अंतिम निकाल काय?
BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
BMC निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीचा धुव्वा उडाला. हे दोन्ही पक्ष 75 जगांच्या आसपास आहेत. या निकालावर खासदार कंगना राणौत हिने आनंद व्यक्त केला आहे. माझं घर तोडणारे आता सत्तेतून बेदखल झाले आहेत. त्यांना सत्तेतून बाहेर फेकण्यात आले आहे. भाजपच्या या जोरदार विजयावर कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तीन दशकांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला पहिल्यांदाच ढासळला आहे. आता भाजपचा इथं महापौर होईल.
काय म्हणाली कंगना राणौत?
कंगना राणौत हिने या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तिच्या घरावर कारवाई केली होती. मुंबई हायकोर्टाने या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. ही द्वेषपूर्ण करावायी असल्याचा निर्वाळा दिला होता. या सर्व घटनेची आठवण कंगनाला यावेळी आली. ज्या लोकांनी मला शिव्या घातल्या. मला धमकी दिली. माझं घर पाडलं. मला अत्यंत वाईट बोलले, मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली. आज महाराष्ट्रानं त्यांना सोडलं आहे. मला आनंद आहे की महिलांचा द्वेष करणाऱ्यांना, धमक्या देणाऱ्यांना, या माफियांना जनता जनार्दनाने त्यांची जागा दाखवली, अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगनाने दिली.
काळाचे चक्र फिरल्याशिवाय राहत नाही
बीएमसी निकालानंतर समाज माध्यमावर उद्धव ठाकरेविरोधातील कंगनाचा 2020 मधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा कंगनाचे कार्यालय पाडण्यात आले. त्यावेळी कंगनाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते की तुम्ही चित्रपट माफियांना सोबत घेऊन माझे घर तोडले आणि मोठा बदला घेतला? आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचे गर्वाचे घर खाली होईल. काळाचे चक्र आहे ते फिरल्याशिवाय राहणार नाही.
