Kishori Pednekar on Navneet Rana: बबली अजून नासमझ आहे, किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांना डिवचले

Kishori Pednekar on Navneet Rana: भ्रष्टाचारावर बोलतात अजून एकही सिद्ध झाला नाही. बंटी बबलीमुळे आमची मुंबईशी नाळ तोडली जाणार नाही.

Kishori Pednekar on Navneet Rana: बबली अजून नासमझ आहे, किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांना डिवचले
बबली अजून नासमझ आहे, किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांना डिवचलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 6:46 PM

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना ललकारले. राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवू, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. त्यावर शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. खासदार आहे तर खासदारां सारखी वाग. आम्हाला नको शिकवू. नंतरचे फोटोबिटो आले. अजूनही त्या नासमझ आहेत. आम्हाला वाटलं होतं बबली मोठी झाली. बबली मोठी नाही झाली. ती नासमझ आहे. मागचा एम्पिलीफायर वाढतोय म्हणून खाज वाढते. ती खाज आहे. त्या खाजेवर आमच्याकडे औषध आहे, अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

किशारी पेडणेकर या मीडियाशी संवाद साधत होत्या. याला हल्लाबोल नाही ही खाज म्हणतात. हल्लाबोल करण्यासाठी मुख्यमंत्री तसे नाहीत. एकाची पोट दुखी तर एकाची बेंबी दुखी आहे. कोणाचा भोंगा तर कोणाचा सोंगा आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोलल्या शिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही. कोण एम्प्लिफायर जाऊन त्यांना भेटले. कुणाची ऊर्जा आहे ते कळले. आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

शाळेचा स्तर उंचावला

आम्ही पाणी धोरण आणले ते काय श्रीमंतासाठी आणले नाही. लोकं ठरवतील ना तुम्ही कोण? शाळेत प्रवेश घेण्यासाठी लाईन लागते. पालिकेच्या शाळेचा स्तर उंचवला. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शिवसेनेने सोडविला, असं त्यांनी सांगितलं.

कायद्यात राहून लढू

विरूद्ध दिशेला भोंगा वाजविला. म्हैस पळविली जाते, भोंगा वाजविला जातो. एम्प्लिफायर पायघड्या घालायला तयारच आहेत. येऊनच दाखवा. आम्ही कायद्यात राहून लढा देणार. दिल्लीपर्यंत पोहचवा. एम्प्लिफायर आले होते. पण संघर्षातून आम्ही तेज उजळवणार, असं त्या म्हणाल्या.

आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार

भ्रष्टाचारावर बोलतात अजून एकही सिद्ध झाला नाही. बंटी बबलीमुळे आमची मुंबईशी नाळ तोडली जाणार नाही. शत्रुत्व तुम्ही वाढवतात, असंही त्यांनी सांगितलं. आदित्य अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. तो त्यांचा दौरा असेल, आम्ही आमचा दौरा करणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.