अबब! मुंबईत हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली

नुकत्याच अंधेरी येथील झालेल्या एका कार्यक्रमात हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळताना दिसला. | Alphonso hapus mango

अबब! मुंबईत हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली
हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 9:09 AM

मुंबई: फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला (Alphonso mango) यंदा बाजारपेठेत नेहमीप्रमाणे विक्रमी किंमत मिळताना दिसत आहे. आंब्याचा मोसम नुकताच सुरु झाला असून सध्या बाजारपेठेत अत्यंत मर्यादित प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळताना दिसत आहे. (Alphonso hapus mango price in Mumbai)

नुकत्याच अंधेरी येथील झालेल्या एका कार्यक्रमात हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळताना दिसला. राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.

शेतकऱ्यांना अडत्यांशिवाय आंबा थेट बाजारपेठेत विकण्याची सोय

कोकणातील (Kokan) हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.

कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन विकत घेतली.

2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?

गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाप्रमाणे खुडूसच्या केशर आंब्याची बाजारपेठेत प्रचंड चर्चा असते. गेल्या हंगामात हवामान बदलामुळे राज्यात आंबा उत्पादनात घट झाली होती. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांना आंब्याची गोडी चाखता आली नाही. पण यंदा सोलापूर जिल्ह्यातील खुडूस येथील शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी योग्य व्यवस्थापन आणि बागेची काळजी घेतल्याने केशर आंबा पोटभरून खायला मिळणार आहे. कारण या बागेतील आंब्याच्या झाडांना आताच मोठा मोहर आला आहे.

माळशिरस तालुक्यात माळरान भाग असल्याने अनेक ठिकाणी केशर आंब्याच्या बागांची लागवड केली जाते. खुडूसमध्ये सरगर कुटुंबाने सुध्दा अशाच एका शासकीय योजनेतून केशर आंबा बागेची लागवड केली.

खुडूसचा सरगर यांचा केशर आंबा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होईल. त्यानंतर मे अखेर हा आंबा उपलब्ध असेल. सरगर यांची सहा एकर आंब्याची बाग आहे. एकरी 25 टन केशर आंबा मिळण्याचा अंदाज सरगर यांना आहे.

संबंधित बातम्या:

यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये

कोरोनाच्या भीतीनं हापूस आंब्याच्या परदेश निर्यातीला फटका, शेतकरी चिंतेत

2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?

(Alphonso hapus mango price in Mumbai)

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.