AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेला सुद्धा लावला चुना; महिलेचा गेटअप करुन या पठ्ठ्याने भरले 30 अर्ज, अकोल्यात ही पुरुषाची ‘घुसखोरी’

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेत सरकारला चुना लावण्यासाठी काही भाऊरायांनी पण घुसखोरी केली आहे. अकोल्यात नुकताच एका पुरुषाचा अर्ज छानणी दरम्यान समोर आल्यानंतर, या पठ्ठ्याच्या करानाम्याने तर प्रशासकीय यंत्रणाच हादरुन गेली आहे. असा समोर आला हा या योजनेतील घोटाळा?

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेला सुद्धा लावला चुना; महिलेचा गेटअप करुन या पठ्ठ्याने भरले 30 अर्ज, अकोल्यात ही पुरुषाची 'घुसखोरी'
लाडकी बहीण योजनेत पुरुषांची घुसखोरी
| Updated on: Sep 03, 2024 | 10:33 AM
Share

लाडकी बहीण योजनेला राज्यात जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एक कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम पण जमा झाली. पण लाडकी बहीण योजनेत भाऊरायांनी पण घुसखोरी केल्याचे समोर आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. अकोल्यात नुकताच एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. छानणी दरम्यान तो उघड झाला. पण आता मोठा घोटाळा समोर आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली आहे. एका पठ्ठ्याने या योजनेसाठी महिलेच्या वेशात एक दोन नाही तर 30 अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.

काय आहे घोटाळा

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करुन या योजनेसाठी 30 वेगवेगळी अर्ज केले. या 30 पैकी 26 अर्जाचे खाते तर एकाच बँकेत निघाले. हे खाते एका सहकारी बँकेचे असल्याचे समोर आले आहे. या पठ्ठ्याने हा महाघोटाळा करत लाडकी बहीण योजनेलाच चुना लावला. या खात्यात ही रक्कम जमा झाली.  याप्रकरणात पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या आरोपीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी या पनवेलमधील महिलाचा फोटो वापरला. महिलेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

महिलांच्या वेशात फोटो

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या आरोपीने अगोदर महिलांचे वेगवेगळे कपडे घातले. पंजाबी सूट, पोलकं, साडी, विविध केश रचना करत त्याने स्वतःचेच अनेक फोटो काढले. असे त्याने 27 फोटो काढले. स्वतःची 27 रुपात त्याने फोटो काढले. या प्रत्येक फोटोला, छायाचित्राला त्याने वेगवेगळ्या महिलांचे आधार कार्ड जोडले. विशेष म्हणजे त्याचे सर्व अर्ज मंजूर झाले. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात योजनेची रक्कम सुद्धा जमा झाल्याची माहिती एनबीटीने दिली आहे.

असा झाला भांडाफोड

खारघर येथील पूजा महामुनी (27) यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली. पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज नामंजूर होत होता. दरम्यान 15 ऑगस्टनंतर अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक शोधून काढला.

पूजाने एनबीटीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा अर्ज नामंजूर झाला. त्यामुळे त्यांनी पनवेल शहरतील नगरसेवकाची मदत घेतली. 29 ऑगस्ट रोजी त्यांनी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकावरुन अर्ज सादर केला. त्यावेळी तुमचा अर्ज अगोदरच मिळाला आहे आणि तो मंजूर झाल्याचा सिस्टिम जनरेटेड मॅसेज आला. तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

30 लाभार्थी एकाच क्रमांकावर

पनवेल तहसील कार्यालयाने याप्रकरणात सावधगिरीने पाऊल टाकले. त्यांनी आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक शोधला. त्यावर कॉल केला. त्यात योजनेसंबंधीची माहिती सांगत, एका प्रक्रियेसाठी ओटीपी मागितला. त्यावेळी सिस्टममध्ये 30 लाभार्थ्यांसाठी एकच मोबाईल क्रमांक वापरल्याचे समोर आले. त्यानंतर तहसील कार्यालयाने संबंधिताविरोधात तक्रार करत कारवाईची विनंती केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.