Ladki Bahin Yojana: या पात्र बहिणीच आता लाडक्या; सरकारचा मोठा निर्णय, e-kyc ला इतके दिवस मुदतवाढ, अपडेट काय

Ladki Bahin Yojana e-kyc : ई-केवायसीसाठी राज्य सरकारने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण यासोबतच पात्र बहिणीच लाडक्या असतील असं अधोरेखित केले आहे.

Ladki Bahin Yojana: या पात्र बहिणीच आता लाडक्या; सरकारचा मोठा निर्णय, e-kyc ला इतके दिवस मुदतवाढ, अपडेट काय
लाडकी बहीण योजना ई-केवायसी
| Updated on: Oct 15, 2025 | 8:44 AM

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काल e-KYC साठी अजून 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याची घोषणा केली. राज्यातील पूरग्रस्त 29 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना e-KYC साठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. याकाळात त्यांना विहीत पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत होती, आता पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही अतिरिक्त सवलत जाहीर झाली आहे. पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ई केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिलाच लाडक्या बहिणी ठरणार आहेत.

E-KYC प्रक्रियेला वेग

  1. राज्यात रोज जवळपास 4 लाखांपेक्षा महिलांकडून e-KYC प्रक्रिया
  2. आतापर्यंत अंदाजे 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांची e-KYC पूर्ण
  3. 2.5 लाखांहून अधिक महिलांची 90 टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण
  4. पण तांत्रिक अडचणींचा मोठा खोडा

Ladki Bahin Yojana E Kyc : अशी करा ई-केवायसी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या साईटवर जा.

लॉगिन झाल्यावर e-KYC वर क्लिक करा. e KYC फॉर्म भरा.

लाभार्थी बहिणीने फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) टाका.

आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन Send OTP वर क्लिक करा. आता तुमच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाका आणि Submit बटण दाबा.

पुढे पात्र बहिणीने पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नोंदवा वा.

आता पुन्हा संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit बटणावर क्लिक करा.

लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा.

आता ही बाब प्रमाणित (Declaration) करून द्या

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा तो निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. याची नोंद कररत चेक बॉक्सवर क्लिक करा आणि Submit करा.

3. “तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश  शेवटी स्क्रीनवर झळकेल.