VIDEO: आर्यन बेकायदेशीरपणे ताब्यात, व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काहीच नाही, केवळ तपासासाठी आरोप; वकिलाचा दावा

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, केवळ तपासासाठीच आर्यनवर हे आरोप लावण्यात आले आहेत. (lawyer denied all allegations on aryan khan)

VIDEO: आर्यन बेकायदेशीरपणे ताब्यात, व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काहीच नाही, केवळ तपासासाठी आरोप; वकिलाचा दावा
aryan khan
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 6:50 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, केवळ तपासासाठीच आर्यनवर हे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येही काहीच आढळून आलं नसून त्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर मीडियाशी बोलताना अरबाजच्या वकील अद्वेत ताम्हणकर यांनी ही माहिती दिली. अरबाजच्या वकिलाला आर्यनबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर या सर्वांना 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्वांवर जामिनपात्रं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 7 तारखेनंतर त्यांना निश्चितच जामीन मिळेल, असं ताम्हणकर यांनी सांगितलं.

सिंडिकेट नाही

सिंडिकेट आणि त्याचा काही संबंध नाही. आर्यन खान सहआरोपी आहे. त्यांचा सिंडिकेटचा काही संबंध नाही. त्यांच्याकडे ड्रग्ज सपाडलं नाही. सुनावणीवेळी व्हॉट्सअ‍ॅपच चॅटचा उल्लेख झाला. पण त्यातूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यांचं सिंडिकेट असल्याचं काहीच दिसून आलं नाही. त्यांच्यावर केवळ आरोप लावले आहेत. तपास करण्यासाठी आरोप करण्यात आलं आहेत. तपास केल्यावर काहीही सापडणार नाही. कारण त्याने काही केलेलं नाही. त्याला फ्रेम केलं गेलं आहे. त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं असून ते योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

तब्बल अडीच तास युक्तिवाद

ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या तिघांना कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

मानेशिंदेंचा दावा काय?

आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतिश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं.

आर्यन चार वर्षांपासून ड्रग्ज घेतो

दरम्यान, आर्यन खान हा गेल्या चार वर्षापासून ड्र्ग्ज घेतो आणि त्याच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी केला होता. ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठीच आर्यनची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली गेली. ती कोर्टानं मंजूर करत आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली गेलीय.

संबंधित बातम्या:

aryan khan drug case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ

(lawyer denied all allegations on aryan khan)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.