AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये कोणता गुजराती कंत्राटदार आणला? गिरीश महाजन यांचं राज ठाकरेंना चॅलेंज

राज ठाकरेंनी नाशिकमधील खड्डे आणि गुजराती कंत्राटदारांवरून सरकारला लक्ष्य केले होते. यावर गिरीश महाजनांनी जोरदार पलटवार केला. 'नाशिक सुंदर केले असते तर मनसेचा एकही नगरसेवक का निवडून आला नाही?' असा सवाल त्यांनी विचारला. महाजनांनी कंत्राटदारांची यादी देण्याचे आव्हान देत, सिमेंट काँक्रिट रस्त्यांनी नाशिक 30 वर्षे खड्डेमुक्त करणार असल्याचे सांगितले आणि भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले.

नाशिकमध्ये कोणता गुजराती कंत्राटदार आणला? गिरीश महाजन यांचं राज ठाकरेंना चॅलेंज
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2026 | 4:54 PM
Share

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातच्या कंत्राटदारांना कामं दिली आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये खड्डे पडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमची सत्ता असताना नाशिक सुंदर होतं. पण आम्ही केलेल्या कामांकडेही दुर्लक्ष केलं जात आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही नाशिक एवढं सुंदर केलं होतं तर मग तुमचा एक तरी नगरसेवक का निवडून आला नाही? सर्वच्या सर्व कसे पडले? असा सवाल करतनाच नाशिकच्या कंत्राटदारांची यादी पाठवतो. एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा, अंस आव्हानच गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. नाशिककरांनी आपलं सरकार पाहिलं. तुमचे महापौर पाहिलं. तुमचा कार्यकाळ संपल्यावर एकही नगरसेवक निवडून दिला नाही. एवढं सुंदर नाशिक केलं होतं तर लोकांनी असा रिजल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केलं नाही. नुसत्या गप्पा केल्या. सुंदर हरीत काहीही केलं नाही. नाशिक सुंदर केलं तर मग तुमचे दोन चार नगरसेवक निवडून आले असते. कुणालाच निवडून दिलं नाही. यावरून तुम्ही काय केलं हे दिसतं. लोकांना सर्वांना माहीत आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

30 वर्ष खड्डा पडणार नाही

नाशिक शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहोत. पुढचे 30 ते 40 वर्ष खड्डा पडणार नाही याची काळजी घेऊ. रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने त्रास होणार आहे हे आधीच सांगितलं होतं. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात मी तीन दिवस नाशिकमध्ये होतो. आढावा घेत होतो, असं गिरीश महाजन म्हणाले.

यादीच देतो…

गुजराती कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंचा काही तरी गैरसमज झाला आहे. मी त्यांना कामाची यादी देतो. शहरात दीड हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्याचे ठेकेदार सांगावेत. आऊटर रिंगरोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार त्यांनी सांगावेत. त्याची यादी देतो. त्यातही गुजरातचे कोण ते सांगावे. घाटाची कामे सुरू आहे. सर्व यादी देतो. बाहेर राज्यातील ठेकेदार कोण आहे हे त्यांनी सांगावं. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकतो. तरी सुद्धा बाहेरचे ठेकेदार कोण हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच महाजन यांनी दिलं.

कशाला राजकीय विधानं करता?

नाशिकमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, असं म्हणत आहेत. त्याचीही यादी देतो. पालिकेची कामे 20 ते 22 टक्के बिलो आहेत. दुरुस्तीची कामे 30 टक्के बिलो दिली आहेत. यात भ्रष्टाचार कसा असेल? फायबर केबलची कामे दिली, ती 42 टक्के बिलो आहेत. मग कशासाठी राजकीय विधानं करता? विनाकारण घाणेरडे आरोप करू नका. आपण आयआयटीची नियुक्ती केली आहे. आम्ही कोणत्याही टेंडरमध्ये गफलत केली नाही, असं ते म्हणाले.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...