AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना ‘त्या’ होर्डिंग्जची आठवण करून देईन: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दबावात काम करत आहेत असं मला वाटतं. माणूस चुकीचं पाऊल उचलतो. त्यानंतर आपण उचलेलं पाऊल खरं होतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समजूतदार आहेत.

गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना 'त्या' होर्डिंग्जची आठवण करून देईन: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज
गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना त्या होर्डिंग्जची आठवण करून देईल: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज Image Credit source: nitesh ran's twitter
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 5:03 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे दबावात काम करत आहेत असं मला वाटतं. माणूस चुकीचं पाऊल उचलतो. त्यानंतर आपण उचलेलं पाऊल खरं होतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समजूतदार आहेत. त्यांच्याशी माझी हिंदुत्वावर वैयक्तिक चर्चा झाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या प्रथम पुण्यतिथीला मी गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर उपस्थित होते. बाळासाहेबांना श्रद्धांजली दिल्यानंतर मी शिवसेनेच्या एका होर्डिंगवर वाचलं होतं की आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत. त्यासंबंधात माझी त्यांच्याशी चर्चा पण झाली होती. गरज वेळ पडल्यास त्यांना त्या होर्डिंगची आठवण करून देईन, असं महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी सांगितलं. विश्वेश्वरानंद यांच्या हस्ते ‘मुंबई असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. भाजपचे आणदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार नितेश राणेही (nitesh rane) यावेळी उपस्थित होते.

  1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यता आलं. वरळी येथील शहीद स्मारकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विश्वेश्वरानंदजी महाराज मीडियाशी बोलत होते. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून देणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सध्या उद्धव ठाकरे जसं वागत आहेत. हा त्यांचा स्वभाव नाही असंही ते म्हणाले.
  2.  उद्धव ठाकरे यांचे जे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या स्वभावाला दाबून ठेवले आहे. त्यांना स्पष्ट बोलता येत नाहीये. त्या मागचं कारण काय हे त्यांनाच माहीत असेल. उद्धवजींना मी अनेक वेळा भेटलो आहे. त्यांचा असा स्वाभाव नव्हता. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. पण एका कार्यक्रमात बोलवलं होत. तेव्हा त्यांच्याकडून कळवण्यात आले होते की, ते आता धर्मनिरपेक्ष शक्तीच्या सोबत आहोत. त्यामुळे ते कार्यक्रमात आले नाहीत असं मला कळवण्यात आले होते. मात्र, त्यांनी स्वत: मला हे सांगितलं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.
  3. उद्धव ठाकरेंशी संवाद साधण्याची मला संधी आली नाही. पण मला संधी मिळाली तर त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देईन. त्यांना विचारेन की तुम्ही असं का केलं?, असं सांगतानाच भाजप -शिवसेना एकत्र येणार की नाही हा राजकीय विषय आहे. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत आणि जेव्हा व्यक्ती मोठा होतो तेव्हा त्याला समजावणं व्यर्थ आहे. पण तरी पण काही गोष्टी असतील तर समजूतदारपणे मार्ग काढला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
  4. उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडावं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर मी त्यांना का सल्ला देऊ? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी जाणून समजूनच आघाडीत प्रवेश केला आहे. ते काही लहान बालक नाहीयेत. त्यांना सर्व माहीत आहे. त्याचा परिणाम काय होणार हे सुद्धा माहीत आहे. हिंदुत्व आणि मराठी हे त्यांच्या पक्षाचं मुख्य उद्देश आहे. त्या दिशेने ते किती पुढे जात आहेत. कुणाच्या सोबत आहेत. याचा विचार त्यांनी स्वत: केला पाहिजे. कदाचित त्यांना बाहेर पण पडायचं असेल पण ते संधी शोधत असतील, मला असं वाटतं की जेव्हा त्यांना संधी मिळेल. सुबह का भुला शाम तक घर भी आ जाये तर त्याला भरकटलेले म्हटलं जात नाही. त्यांनी आता या बद्दल विचार केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या का नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Russia Ukraine War Video: आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं सडेतोड उत्तर, याला म्हणतात नीडर लीडर

कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय, अशोक चव्हाण यांचं संभाजी छत्रपतींच्या वक्तव्यावर उत्तर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.