AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार नगर

अहमदनगरचं नामांतर करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. विविध पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी केली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, आता 'या' नावाने ओळखलं जाणार नगर
| Updated on: Mar 13, 2024 | 3:59 PM
Share

मुंबई | 13 मार्च 2024 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलं आहे. अहमदनगरचं नामांतर करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. विविध पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी केली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सरकारने याआधी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं आहे. त्यानंतर आज अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं देखील नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकांना ब्रिटिश कालीन नावं आहेत. पण आता त्यांचं नामकरण केलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग असं केलं जाणार आहे. सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी असं केलं जाणार आहे. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी असं केलं जाणार आहे. तर चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगांव असं केलं जाणार आहे. तसेच कॉटन ग्रिनचं काळाचौकी, डॉकयार्डचं माझगांव, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं तिर्थकर पार्श्वनाथ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाना जगन्नाथ शंकर शेट असं नामांतरण केलं जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय-काय निर्णय घेण्यात आले?

  1. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर (मराठी भाषा विभाग)
  2. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार (गृह विभाग)
  3. अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता (सामान्य प्रशासन विभाग)
  4. केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता (नगरविकास विभाग)
  5. श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  6. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प (मदत व पुनर्वसन)
  7. भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज ( वित्त विभाग)
  8. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ (आरोग्य विभाग)
  9. महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार (दुग्धविकास विभाग)
  10. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार (जलसंपदा विभाग)
  11. मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार (जलसंधारण विभाग)
  12. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. (महिला व बालविकास)
  13. मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)
  14. आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)
  15. कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार. ( ऊर्जा विभाग)
  16. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार. ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग)
  17. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)
  18. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता ( महसूल विभाग)
  19. म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  20. आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
  21. ( सार्वजनिक आरोग्य विभाग)
  22. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार ( परिवहन विभाग)
  23. मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता ( नगरविकास विभाग)
  24. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते ( ग्रामविकास विभाग)
  25. भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  26. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन ( महसूल व वन विभाग)
  27. जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता ( परिवहन विभाग)
  28. दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना ( पशुसंवर्धन व दुग्धविकास)
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.