काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?
नाना पटोले अमित देशमुख

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याचं काल चर्चा होती. पण, रात्रीतून नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. Nana Patole or Amit Deshmukh

Yuvraj Jadhav

|

Feb 05, 2021 | 7:54 AM

मुंबई:  विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याचं काल चर्चा होती. पण, रात्रीतून नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पटोलेंऐवजी लातूरचे आमदार अमित देशमुख यांचं नाव आता प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर येतं आहे. असं झालं तर मग नाना पटोलेंचा आता रोल काय असणार याचीही चर्चा सुरु झालीय. ( Maharashtra Congress President who got position Nana Patole or Amit Deshmukh politics in Congress)

नाना की अमित देशमुख? काँग्रेस समोर पेच?

राजीनामा दिल्यानंतरही नाना पटोले किंवा कुठल्याच काँग्रेस नेत्यानं पटोलेच प्रदेशाध्यक्ष असतील, असं म्हटलेलं नाही. दिल्लीतूनही अजून पटोलेंच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा झालेली नाही. त्याला ज्याप्रमाणं उशीर होतोय ते पहाता पटोलेंना मंत्रिमंडळात घेऊन अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची चर्चा आहे. पटोले हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं तर तिघांच्या सरकारमध्ये अडचण होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढं येत आहे.

थोरात गटाकडेच पुन्हा प्रदेशाध्यक्षपद ?

काँग्रेसमध्ये राज्यात वेगवेगळे गट कार्यरत आहेत. त्यात थोरात, चव्हाण, वडेट्टीवार, राऊत असे वेगवेगळे गट असल्याचं दिसतं. विदर्भ, मराठवाडा आणि प.महाराष्ट्र अशीही गटबाजी वारंवार दिसून आली आहे. त्यात अमित देशमुख यांच्या नावाला अशोक चव्हाण गट विरोध करत असल्याचीही चर्चा आहे. तर थोरातांनी संपूर्ण वजन अमित देशमुखांसाठी वापरल्याचं बोललं जातंय. खुद्द थोरात आणि अमित देशमुखांचे वडील विलासराव यांच्यात चांगले संबंध राहीलेत. त्याच पार्श्वभूमीवर पटोलेंऐवजी देशमुख प्रदेशाध्यक्ष झाले तर आश्चर्य वाटू नये.

मंत्रीपद सोबत प्रदेशाध्यक्षपद?

दिल्लीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार, हायकमांडला एक पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्ष हवाय जो पक्षवाढीसाठी काम करेल. पण राज्यात कुठल्याही नेत्याला हे पद मंत्रीपदासह हवं असल्याचं दिसतं आहे. नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब तेवढं बाकी होतं. पण त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपदही मागितलं आणि सगळंच बारगळलं. आताही अमित देशमुखही मंत्रीपदाशिवाय प्रदेशाध्यक्षपदाला तयार होतील याची शक्यता नसल्याचं जाणकारांना वाटतं. म्हणजेच पटोले असोत की देशमुख एक व्यक्ती दोन पद असं काँग्रेसमध्ये होण्याची चिन्ह आहेत.

कोण आहेत अमित देशमुख?

अमित देशमुख हे सध्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत पण विलासरावांचे पूत्र म्हणूनच त्यांची  मोठी ओळख आहे. अलिकडेच त्यांनी बंधू धीरजसाठी लातूर ग्रामीणची सीट फिक्स केल्याचा आरोप भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यावेळी अमित देशमुख चर्चेत आले होते. विलासरावांच्यानंतर लातूरचे आमदार म्हणून अमित देशमुखच प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल गांधींच्या गटातले म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

संबंधित बातम्या:

मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच? के. सी. पाडवींचं नाव जवळपास निश्चित? काय आहे काँग्रेसची खेळी?

( Maharashtra Congress President who got position Nana Patole or Amit Deshmukh politics in Congress)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें