विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच? के. सी. पाडवींचं नाव जवळपास निश्चित? काय आहे काँग्रेसची खेळी?

पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच रहाण्याची शक्यता वर्तवली जातेय (K C Padvi Vidhansabha Speaker)

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच? के. सी. पाडवींचं नाव जवळपास निश्चित? काय आहे काँग्रेसची खेळी?
के सी पाडवी आणि नाना पटोले

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी (Nana Patole) राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पडद्याआड मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आता विधानसभा अध्यक्ष कोण होणार याचीही चर्चा जोरात आहे. तसंच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही नवं नाव चर्चेत आलं आहे आणि ते आहेत लातूर शहरचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh). (Congress Leader K C Padvi likely to become Vidhansabha Speaker)

के.सी.पाडवी होणार नवे विधानसभा अध्यक्ष?

पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच रहाण्याची शक्यता वर्तवली जातेय. शरद पवारांनी मात्र हे पद आता खुलं झालं आहे असं म्हटलं होतं. पण कुणाकडे कुठली पदं राहतील हे सरकार बनतानाच निश्चित झालं आहे आणि त्यात फार बदल होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांना वाटतं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आदिवासी मंत्री कागदा चांद्या पाडवी म्हणजेच के. सी. पाडवी (K C Padvi) यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. पाडवी हे काँग्रेस निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अलिकडेच सोनियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, आदिवासी, मागास वर्गासाठी खास निधीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पाडवींना अध्यक्ष केलं तर आदिवासी समाजात चांगला मेसेज पोहोचेल असं गणित मांडलं जात आहे.

कोण आहेत के.सी. पाडवी?

के.सी. पाडवी हे जवळपास 1990 पासून अक्कलकुव्याचे आमदार आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलेलं आहे. काँग्रेस निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सात वेळेस ते विधानसभेवर निवडूण आलेले आहेत. आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

के.सी.पाडवी आणि राज्यपाल वाद?

मंत्रीपदाची शपथ घेताना के.सी.पाडवी यांचा राज्यपालांसोबत वाद झाला होता. शपथ घेताना जो मजकुर ठरवून दिलेला होता, त्यात पाडवींनी सोनिया, राहुल गांधींचीही नावं जोडली. त्यावर राज्यपाल कोश्यारी नाराज झाले आणि त्यांनी पाडवींना पुन्हा शपथ घ्यायला भाग पाडलं. पुन्हा असं न करण्याची चेतावणीही इतर नेत्यांना देण्यात आली.

संबंधित बातम्या :

पवार काय बोलत आहेत त्यावर बोलणार नाही, पण तिघांशी बोलून निर्णय-पटोले

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

(Congress Leader K C Padvi likely to become Vidhansabha Speaker)

Published On - 7:33 am, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI