Maharashtra Corona Update : चिंतेत वाढ; गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू, 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Maharashtra Corona Update : चिंतेत वाढ; गेल्या 24 तासांत 568 जणांचा मृत्यू, 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरु केलीय. त्याबाबतचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांकडून दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधून लॉकडाऊनबाबत माहिती देणार होते. मात्र, नाशिकच्या दुर्घटनेनंतर मुख्य सचिवांकडून लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अशावेळी राज्यातील कोरोनास्थिती अधित चिंताजनक बनल्याचं आजच्या आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.(568 corona Patient died today, 67 thousand 468 new corona patient)

गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्या 6 लाख 95 हजार 747 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81.15 टक्के इतका आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत गेल्या 24 तासांत 7 हजार 684 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज 6 हजार 790 कोरोनारुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईत सध्या 84 हजार 743 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 48 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्के इतका आहे. 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.42 टक्के राहिलाय.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 529 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 530 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 51 हजार 920 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 314 जणांची प्रकृती गंभीर आहे. आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 82 हजार 491 वर पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 24 हजार 297 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 6 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे. नागपुरात आज तब्बल 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

नागपुरात गेल्या 24 तासांत 7 हजार 229 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 7 हजार 266 जणांची आज कोरोनावर मात केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजार 457 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर नागपुरात आतापर्यंत 6 हजार 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

maharashtra lockdown update | मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार; नवे नियम कोणते ?

Maharashtra Lockdown : रेल्वे, बस सेवा सुरुच, जिल्हाबंदीही नाही, पण सबळ कारणाशिवाय जिल्ह्याबाहेर पडण्यास मनाई

568 corona Patient died today, 67 thousand 468 new corona patient

Published On - 9:38 pm, Wed, 21 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI