मंत्रालयाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल?; आता कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलावणार?

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी निर्बंध घातले आहेत. (maharashtra government change duty schedule of mantralaya workers)

मंत्रालयाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल?; आता कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलावणार?
मंत्रालय

मुंबई: मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी निर्बंध घातले आहेत. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्याचं घटत आहे. कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवायचं की दोन शिफ्टमध्ये बोलवायचं याचा अधिकार प्रत्येक खात्याला देण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रालयातील कोणतं खातं काय निर्णय घेतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (maharashtra government change duty schedule of mantralaya workers)

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलमधील गर्दीमुळे ही संख्या अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे मंत्रालयात शिफ्टची वेळ बदलण्यात आली होती. मंत्रालयात एका शिफ्ट ऐवजी दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मंत्रालयातील गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मंत्रालयातील प्रत्येक खात्याला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट ठरवण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एका शिफ्टमध्ये कामावर बोलवायचे की दोन शिफ्टमध्ये? की दिवसाआड कामावर बोलवायचे? याचा निर्णय मंत्रालयातील विविध खाती घेणार आहेत. मंत्रालयात एकूण 24 खाते आहेत. त्या त्या खात्याच्या कामाच्या स्वरुपानुसार आणि गरजेनुसार कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळांचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नाईट कर्फ्यू लागणार

दरम्यान, मुंबईत कोरोनाची संख्या वाढत असल्याने मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दिवसा आणि रात्रीही मोठी गर्दी होत आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील आकडा वाढताच

राज्यात 1 लाख 26 हजार 231 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात मुंबईत 12 हजार 535 रुग्ण असून ठाणे जिल्ह्यात सध्या12 हजार 332 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 25 हजार 673 इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून 16 हजार 964 इतका झाला आहे. नाशिकमध्ये ही संख्या 7 हजार 688 इतकी आहे. अमरावतीत ही संख्या 3 हजार 997, औरंगाबादमध्ये 7 हजार 148, जळगावमध्ये 4 हजार 944, अहमदनगरमध्ये 2 हजार 328 इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या 401 इतकी आहे.

नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढ

राज्यात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे (Maharashtra Corona Update). या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे. (maharashtra government change duty schedule of mantralaya workers)

 

संबंधित बातम्या:

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी, जाणून घ्या काय सुरु?, काय बंद?

Pune corona update | पुण्यात मृतांचा आकडा 5 हजाराच्या उंबरठ्यावर, रोज हजारो रुग्णांची नोंद, वाचा नेमकी स्थिती काय?

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

(maharashtra government change duty schedule of mantralaya workers)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI