Maharashtra Unlock: संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे.

Maharashtra Unlock: संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय
सांकेतिक फोटो

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Government released new guidelines said all districts impose level 3 restriction due to increasing corona virus and delta plus variant cases)

कोरोनाची वाढती संख्या आणि डेल्टा प्लस वेरियंटमुळे निर्णय

महाराष्ट्रात आतापर्यंत डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण समोर आले होते त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर द्वारे होणाऱ्या चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे.

तिसऱ्या लेवल पेक्षा कमी लेवलचे निर्बंध लागू करायचे असतील तर?

जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लेवलपेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीय असं दिसत असेल तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत :

> पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे

> टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे

> हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे

> मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे

> करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे

> गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे

> कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील

4 जूनच्या आदेशातील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध

अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

संबंधित बातम्या:

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

Maharashtra Unlock | राज्यात 5 टप्प्यात निर्बंध उठवणार, कोणत्या टप्प्यात, कोणते जिल्हे अनलॉक?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI