रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख घरे बांधणार, धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. रमाई आास घरकुल योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार आहेत.

रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख घरे बांधणार, धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा
dhananjay munde
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 6:09 PM

मुंबई: राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार आहेत. ग्रामीण आणि शहर भागात बांधण्यात येणाऱ्या या घरकुल योजनेच्या उद्दिष्टांना आज मंजुरी देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेनंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे.

आणखी घरे बांधणार

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल. तसेच या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

विभागनिहाय मान्यता देण्यात आलेली संख्या

>> मुंबई विभागात ग्रामीणच्या 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी

>> पुणे विभागात ग्रामीणच्या 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी

>> नाशिक विभागात ग्रामीणच्या 14864 तर शहरी भागातील 346 घरकुलांना मंजुरी

>> मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीणच्या 30116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी

>> लातूर विभागात ग्रामीणच्या 24274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांना मंजुरी

>> नागपूर विभागात ग्रामीणच्या 11677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी

>> अमरावती विभागात ग्रामीणच्या 21978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी

संबंधित बातम्या:

मुंबईकरांनो सावधान, आफ्रिकेतून 19 दिवसात एक हजार लोक मुंबईत, ट्रेसिंग सुरू

सामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.