…हा कसला महाराष्ट्र धर्म, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून ठाकरे गटाला या नेत्याचं सडेतोड उत्तर

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Dec 05, 2022 | 11:53 PM

सीमावाद सोडवायचा असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधक फक्त या गोष्टीचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

...हा कसला महाराष्ट्र धर्म, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून ठाकरे गटाला या नेत्याचं सडेतोड उत्तर

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरूनही सरकारविरोधात आता विरोधकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनावरून आता शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात असलेल्या विरोधी बाकावरच्या मंडळींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे हाच त्यांचा गुणधर्म असल्याची टीकाही दीपक केसरकर यांनी यावेळी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सध्या राज्यात अनेक वाद उफाळून येत आहे. राजकीय व्यक्ती आणि जबाबदार व्यक्तींकडून छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने विरोधी पक्षाने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

त्याआधीच मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत आम्ही वरिष्ठांबरोबर याबाबत संवाद साधला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून आता आमच्या आंदोलनामुळे हे झालं असं म्हणणं चुकीचं असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमाभागातील नागरिकांना शिंदे सरकारने मदत केली आहे. त्याचबरोबर त्यांना सोयीही दिल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या पोटात दुखतं असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमावादावर न्यायालयामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीसही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडवणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. सीमावाद सोडवायचा असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधक फक्त या गोष्टीचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजच्या घडीला ज्या प्रमाणे विरोधकांकडून राज्य सरकारला विरोध करत आहेत. त्यावरून ते महाराष्ट्राबरोबर नसून ते कर्नाटकाच्या बाजूने बोलत आहेत असं दिसून येत आहे.

आजच्या घडीला जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून ते बेळगावच्या नागरिकांबरोबर राहिले असते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

सीमावादावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये. कारण त्या माणसांनी सीमाभागासाठी 40 दिवस तुरुंगवास भोगला असल्याचेही त्यांनी सांगितले.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI