VIDEO: तिसरी लाट थोपवण्याची तयारी सुरू, लसीकरणावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?; वाचा, सविस्तर

राज्यातील 18 वर्षावरील व्यक्तिंच्या लसीकरणावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कोरोना लसीकरणावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (maharashtra minister balasaheb thorat on vaccine shortage)

VIDEO: तिसरी लाट थोपवण्याची तयारी सुरू, लसीकरणावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?; वाचा, सविस्तर
बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

मुंबई: राज्यातील 18 वर्षावरील व्यक्तिंच्या लसीकरणावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कोरोना लसीकरणावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लसीकरणाबाबत शासकीय स्तरावर नियोजन सुरू आहे. बाहेरून लसी आयात करण्याबाबतची चर्चाही सुरू आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. तसेच कोरोनाची तिसरी लाट थोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. (maharashtra minister balasaheb thorat on vaccine shortage)

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन लसीकरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी ही राज्यांची आहे. मात्र लस उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच आता 18 ते 44 वयोगटातील लोकांनाही लस देण्यात येणार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शासकीय पातळीवर लसीकरणाचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

ऑक्सिजन बेड बाहेरून येत आहेत

राज्यातील नागरिकांचं लसीकरण लवकरात लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी एक रकमी पैसे देऊन लस खरेदी करण्याची आमची तयारी आहे, असं सांगतानाच लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच आणखी ऑक्सिजन बेड्स बाहेरून घेण्यात येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ही लाट थोपवण्यासाठी नियोज सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती

ऑक्सिजन प्लांट उभे करण्यासाठी जवळपास दीड महिना इतका वेळ लागू शकतो. ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी साखर कारखानेही काम करत आहेत. साखर कारखान्यांमधून ऑक्सिजन उत्पादन करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो, असं ते म्हणाले.

सातव यांची प्रकृती स्थिर

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती बिघडली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते आजारातून लवकरच बाहेर येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (maharashtra minister balasaheb thorat on vaccine shortage)

 

संबंधित बातम्या:

Bikramjeet Kanwarpal | कोरोनाने आणखी एक गुणी अभिनेता हिरावला, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

मुंबईकर ऐकेनात, अखेर महापौर किशोरी पेडणेकरांनी हात जोडले; म्हणाल्या…

लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 7 लाख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

(maharashtra minister balasaheb thorat on vaccine shortage)

Published On - 1:16 pm, Sat, 1 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI