AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात चार मजली इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे. (Maharashtra Mumbai Malad Residential Building Collapses)

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर
Malad Residential Building Collapses
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 9:13 AM
Share

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. (Mumbai Malad west residential building collapses Live Update)

नेमकं काय घडलं?

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

बचावकार्य सुरु

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच अद्याप काही जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे दुर्घटना – असलम शेख

मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय या इमारतीचा ढिगारा उपसून त्यात काही जण अडकले आहेत का याचाही शोध सुरु आहे.

घटनास्थळी एकच खळबळ

स्थानिकांच्या मते, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

(Mumbai Malad west residential building collapses Live Update)

संबंधित बातम्या :

समुद्रात भरती, वर मुसळधार पाऊस, बीएमसीच्या 6 केंद्रांच्या सलग 8 तास मेहनतीनं पूरस्थिती टाळण्यात यश

लोकल ठप्प, बसेस नाहीत, वाहतुकीची कोंडी अन् पावसाची रिपरिप; चाकरमानी म्हणतात, जाये तो जाये कहाँ!

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर