AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्यासह 29 महापालिकांचा निकाल स्पष्ट, तुमच्या शहरात कोणाची सत्ता, कोणाचा महापौर?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने १,४२५ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मुंबईत ठाकरेंचे ३० वर्षांचे वर्चस्व संपवत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवला, तर पुणे आणि नागपुरातही भाजपची लाट पाहायला मिळाली.

मुंबई-पुण्यासह 29 महापालिकांचा निकाल स्पष्ट, तुमच्या शहरात कोणाची सत्ता, कोणाचा महापौर?
Maharashtra Municipal Election Results
| Updated on: Jan 18, 2026 | 2:55 PM
Share

राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील २,८६९ जागांपैकी १,४२५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या विजयामुळे भाजपने ठाकरे आणि पवार कुटुंबांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना मोठे खिंडार पाडले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) भाजपने ८९ जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरे कुटुंबाचे तीन दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले. सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेनेने २९ जागा जिंकल्या. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ६५ जागांपर्यंत मजल मारली. त्यासोबतच काँग्रेसला २४ आणि मनसेला ६ जागा मिळाल्या.

पुणे आणि नागपुरात भाजपची लाट

पुण्यात भाजपने ११९ जागा जिंकून पवार कुटुंबाला मोठा धक्का दिला. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २७, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळाल्या. नागपूरमध्ये १५१ पैकी १०२ जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. नाशिक (७२), नवी मुंबई (६५), पिंपरी-चिंचवड (८४) आणि सोलापूर (८७) या शहरांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

महानगरपालिका विजयी पक्ष / आघाडी प्रमुख विरोधी पक्ष सत्तेची स्थिती
मुंबई महायुती (भाजप + शिंदे) शिवसेना (UBT) महायुतीची सत्ता
पुणे भाजप राष्ट्रवादी (अजित/शरद पवार) भाजपची सत्ता
नागपूर भाजप काँग्रेस भाजपची सत्ता
ठाणे शिवसेना (शिंदे गट) शिवसेना (UBT) / राष्ट्रवादी महायुतीची सत्ता
नाशिक भाजप शिवसेना (UBT) / मविआ भाजपची सत्ता
पिंपरी-चिंचवड भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची सत्ता
छ. संभाजीनगर भाजप AIMIM / शिवसेना (UBT) भाजप सर्वात मोठा पक्ष
नवी मुंबई भाजप (गणेश नाईक गट) शिवसेना (UBT) भाजपची सत्ता
कोल्हापूर काँग्रेस / महाविकास आघाडी भाजप मविआचे वर्चस्व
लातूर काँग्रेस भाजप काँग्रेसची सत्ता
चंद्रपूर काँग्रेस भाजप काँग्रेसची सत्ता
वसई-विरार बहुजन विकास आघाडी महायुती बविआची सत्ता
मालेगाव इस्लाम आघाडी / AIMIM महायुती स्थानिक आघाडी
अकोला भाजप काँग्रेस / VBA भाजपची सत्ता
अमरावती भाजप / स्थानिक आघाडी काँग्रेस भाजप आघाडीवर

राज्यातील एकूण पक्षनिहाय जागा (२,८६९)

  • भाजप: १,४२५
  • शिवसेना (एकनाथ शिंदे): ३९९
  • काँग्रेस: ३२४
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): १६७
  • शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray): १५५
  • AIMIM: १२६ (छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३ जागांसह मोठी कामगिरी)
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): ३६
  • मनसे: १३

भाजपची पकड अधिक घट्ट

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या एकूण निकालात शिवसेनेला ३९९, काँग्रेसला ३२४, तर राष्ट्रवादीला (अजित पवार) १६७ जागा जिंकता आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने ५७ जागांसह यश मिळवले. तर तिथे एआयएमआयएमने ३३ जागा जिंकल्या. तसेच लातूर, भिवंडी आणि चंद्रपूरमध्ये मात्र काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवत चांगली कामगिरी केली आहे. मात्र या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे. यामुळे प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.
हॉटेलमध्ये यावं, बिलही त्यांनीच भरावं; गुलाबराव पाटलांची राऊतांना टोला
हॉटेलमध्ये यावं, बिलही त्यांनीच भरावं; गुलाबराव पाटलांची राऊतांना टोला.
पंतप्रधान मोदींकडून मुंबईतील भाजपच्या विक्रमी विजयाचे कौतुक
पंतप्रधान मोदींकडून मुंबईतील भाजपच्या विक्रमी विजयाचे कौतुक.
जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा 'एक है तो सेफ है चा नारा?
जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा 'एक है तो सेफ है चा नारा?.
शिंदेंना बोलायचं ते फडणवीसांशी बोलतील! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
शिंदेंना बोलायचं ते फडणवीसांशी बोलतील! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं.
ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत! नारायण राणेंची खरपूस टीका
ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत! नारायण राणेंची खरपूस टीका.
शिंदेंनी आता नगरसेवकांना कोंडून ठेवलंय! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
शिंदेंनी आता नगरसेवकांना कोंडून ठेवलंय! संजय राऊतांचा खळबळजनक दावा.
... तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो; संजय राऊतांचं मोठं विधान
... तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो; संजय राऊतांचं मोठं विधान.
आम्ही तिथे जेवायला जाणार, पण...; संजय राऊतांचा शिंदेंना टोला
आम्ही तिथे जेवायला जाणार, पण...; संजय राऊतांचा शिंदेंना टोला.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; 'या' स्थानकांवर थांबणार नाही लोकल
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; 'या' स्थानकांवर थांबणार नाही लोकल.