“मी एकेदिवशी उद्धवकडे गेलो, गाडीत बस, मला तुझ्याशी बोलायचंय”, राज ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या आधीचा किस्सा सांगितला

राज ठाकरे यांनी सांगितले की, मी समोर बसवून उद्धव ठाकरे यांना विचारले आहे की, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायच तर हो, मुख्यमंत्री व्हायचं तर हो, तुला जे व्हायचं ते हो.

मी एकेदिवशी उद्धवकडे गेलो, गाडीत बस, मला तुझ्याशी बोलायचंय, राज ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या आधीचा किस्सा सांगितला
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 10:15 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्त्यांसह अनेकांना शिवतिर्थावरून राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ते अगदी फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपर्यंत त्यांनी राज ठाकरे स्टाईलने साऱ्यांचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी बोलताना ठाकरे घराण्यातील अंतर्गत वादाविषयी बोलताना सांगितले की, मला घरातील गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. मात्र काही गोष्टी आज सांगायच्या आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाबळेश्वरला गेल्यानंतर नेमकी काय बोलणी झाली आणि नेमका काय निर्णय झाला या गोष्टीही त्यांनी शिवतिर्थावरील सभेत स्पष्ट केल्या.

राज ठाकरे यांनी बोलताना सांगितल्या की, मला घरातल्या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. तरीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या झालेल्या भेटीत शिवसेना, पक्षप्रमुख पद, सत्ता आली,

तर त्यानंतरचे मुख्यमंत्री पद याविषयी आपल्यामध्ये कोणती बोलणी झाली, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संपुष्टात आलेले मतभेद ते बाळासाहेब ठाकरे यांना कसं सांगितले त्यावरही त्यांनी आपली बाजू मांडली.

त्यानंतर शिवसेनेची जी वाताहात झाली आहे. त्यानंतर आता जी शिवसेनेवर परिस्थिती ओढावली आहे ती का ओढावली आहे त्याला जबाबदार कोण यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाबळेश्वरला गेले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि पक्षप्रमुख, सत्ता आल्यानंतर जर मुख्यमंत्री पद आले तर नेमका उद्धव ठाकरे यांचा निर्णय काय असणार, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी त्यांना काय सांगितले.

तो इतिहासही आज राज ठाकरे यांनी सांगितला. यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, मी समोर बसवून उद्धव ठाकरे यांना विचारले आहे की, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायच तर हो, मुख्यमंत्री व्हायचं तर हो, तुला जे व्हायचं ते हो.

मला फक्त सांग माझं काम काय? मला फक्त प्रचाराला तुम्ही ठेऊ नका, एरव्ही आतमध्ये ठेवायचं आणि प्राचाराला काढायचं याचा मला प्रॉब्लेम नाही मात्र निवडणुकांनंतर जी जबाबदारी घ्यायची आहे ती नेमकी कोण घेणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.