AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडीत मुसळधार पाऊस, पावसाचं पाणी दुकानात शिरलं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, रस्त्यावर फक्त चिखल

शहरात मुसळधार पावसाचं पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं. शहरातील अनेक भागांतील दुकानांत पावसाचं पाणी शिरलं. पावसानंतर जिकडे बघावं तिकडे रस्त्यावर फक्त चिखल दिसत होता.

भिवंडीत मुसळधार पाऊस, पावसाचं पाणी दुकानात शिरलं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, रस्त्यावर फक्त चिखल
भिवंडीत जोरदार पाऊस, पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 2:19 PM
Share

भिवंडी : शहरात मुसळधार पावसाचं पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं. शहरातील अनेक भागांतील दुकानांत पावसाचं पाणी शिरलं. पावसानंतर जिकडे बघावं तिकडे रस्त्यावर फक्त चिखल दिसत होता.

भिवंडी शहरात बुधवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तिनबत्ती, नजराणा कंपाऊंड बाजार पेठेतील शेकडो दुकानात पाणी शिरल्याने गुरुवारी सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी आज दुकाने उघडली. त्यानंतर दुकानदार व्यापारी यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

यामध्ये दुकानातील भाजीपाला, लहान मुलांचे खाऊ, धान्य, मोबाईल, चपला, बूट, हॉटेल, टेलर, कपडा, इलेक्ट्रिक वस्तू, हार्डवेअर ,कॉस्मेटिक दुकानांसह अनेक भाजीपाला विक्री करणाऱ्यांचा माल साचलेल्या पाण्यामुळे खराब झाला. वस्तू, साहित्य, धान्य, खाऊ मातीमोल झाल्याचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालंय.

इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉस्मेटिकसह अनेक मिठाई दुकानांचं नुकसान

मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांना भाजीपाला, धान्य, मुलांचा खाऊ, भाजीपाला कचऱ्यात फेकावा लागला तर मोबाईल, इलेक्ट्रिक साहित्य, कपडा, हॉटेल, मिठाई, कॉस्मेटिकसह अनेक वस्तू, साहित्य भिजल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान होऊन ते मेटाकुटीला आले आहेत.

गोवंडीत वन प्लस ग्राऊंड घर कोसळलं, 4 ठार, 11 जखमी

शिवाजीनगर गोवंडी भागात एक वन प्लस ग्राऊंड घर कोसळलं. पहाटे पाच वाजताची घटना आहे. या घटनेमध्ये 11 लोक जखमी झाले आहेत तर चार लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये जे लोक अडकले होते त्यांचं सुरक्षितपणे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. काही लोकांची चिंताजनक परिस्थिती आहे. राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी ऍडमिट करण्यात आलेला आहे. घटनास्थळी समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी भेट दिली.

(Maharashtra Rain Mumbai Bhiwandi Rain Update)

हे ही वाचा :

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Talai Landslide : महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, काल दुपारी दरड कोसळली, आतापर्यंत काय काय घडलं?

Raigad Talai Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.