AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौजन्यपूर्ण भाषेत बोला, वाद घालू नका, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी फोन वापराबाबत 9 महत्त्वाच्या सूचना

कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा, अशा नऊ सूचना करण्यात आल्या आहेत.

सौजन्यपूर्ण भाषेत बोला, वाद घालू नका, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी फोन वापराबाबत 9 महत्त्वाच्या सूचना
Mobile
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 9:30 AM
Share

मुंबई : सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी, यासह 9 महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

शासकीय कामकाज मोबाईल फोन वापराबाबत महत्त्वाच्या सूचना कोणत्या

1. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा. 2. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा. 3. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी. 4. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये. 5. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा 6. भ्रमण ध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे 7. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमाांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावे. 8. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. 9. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर ठेवावा.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ड्रेसकोड लागू केला होता. त्यानुसार  सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार करण्यात आले. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं होतं.

काय आहेत सूचना?

  • गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत
  • अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये
  • कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत
  • महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावेत

पादत्राणांविषयी नियमावली

  • स्लीपर घालण्यासही सरकारी कार्यालयात परवानगी नाही
  • महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावेत
  • पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी
  • कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये

संबंधित बातम्या :

सरकारचा आदेश जारी; आता एकाच गणवेशात अधिकारी आणि कर्मचारी

काय कपडे घालायचे हे लोकांना कळतं; रोहित पवारांचा साई संस्थानाला टोला

(Maharashtra State Government issues notice for Govt employees while talking on mobile phone)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.