AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुती -महाविकास आघाडीचा 36 चा आकडा सुटेना; अनेक जणांचे गुडघ्याला बाशिंग, मेदवारांची घोषणा केव्हा?

Maharashatra Vidhansabha Election 2024 :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी काही जागांवर अजूनही सहमती झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीत या जागांवरून 36 चा आकडा झाला आहे. काय आहे हा 36 जागांचा पेच? कधी सूटणार हे त्रांगडे? 

महायुती -महाविकास आघाडीचा 36 चा आकडा सुटेना; अनेक जणांचे गुडघ्याला बाशिंग, मेदवारांची घोषणा केव्हा?
महायुती महाआघाडी
| Updated on: Oct 26, 2024 | 12:39 PM
Share
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक बैठकांचे सत्र झाल्यानंतर जागा वाटपावर सहमती झाली. तर  काही जागांवर बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. जागा वाटपात महाविकास आघाडीत अधिक खलबतं झाली. तर महायुतीत तोडगा काढण्यासाठी दिल्लीत मॅरेथॉन बैठकी घेण्यात आल्या. त्यात अनेक जागांवर सहमती झाली. पण राज्यात महाविकास आणि महायुतीने राज्यातील 36 जागांवर उमेदवारी जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या छत्तीसचा आकडा असला तरी जागा वाटपात पण दोघांनीच हाच आकडा गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या ठिकाणी आहे पेच 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 36 मतदारसंघ असे, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महायुतीत 11 जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मविआच्या जागा वाटपात 36 पैकी विदर्भातील 13 मतदारसंघांचा समावेश असून, त्यात अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, अर्णी  या ठिकाणांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या ठिकाणी देखील काही जागा उमेदवारीविना राहिल्या आहेत. यापैकी 15 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ज्यात प्रामुख्याने अकोट, गडचिरोली, बोरीवली, पेन, मालशिरस, आणि पंढरपूर या जागांचा समावेश आहे. दुसरीकडे, महायुतीचे 11 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 30 उमेदवार अजूनही जाहीर व्हायचे आहेत.
मुंबईतील या जागांवर पेच 
महायुतीत 288 जागांपैकी 278 जागांवर सहमती झाली आहे. गुरूवारी दिल्ली दरबारी तीनही पक्षांची बैठक झाली. त्यात अनेक जागांवर तोडगा निघाला. पण मुंबईतील काही जागांवरील पेच कायम आहे. वरळी, शिवडी, चेंबूर, बोरिवली, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द, अंधेरी पूर्व, वर्सोवा, मुंबादेवी, कलिना आणि धारावी या जागांवर आज काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून महत्वाची चर्चा  करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी महायुतीची अंतिम यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा