ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला त्याचपद्धतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल; धनंजय मुंडेंचा विश्वास

ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या पाच वर्षात काही तरी केलं असतं तर 12 कोटी जनतेला भाजपविषयी विश्वास पटला असता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला त्याचपद्धतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल; धनंजय मुंडेंचा विश्वास
धनंजय मुंडे यांची तब्बेत बिघडली
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे

|

May 24, 2022 | 6:28 PM

मुंबई: ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court to Madhya Pradesh) न्याय दिला त्याच पध्दतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. जनता दरबारासाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असताना ओबीसी आरक्षणाबाबत माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला.

ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या पाच वर्षात काही तरी केलं असतं तर 12 कोटी जनतेला भाजपविषयी विश्वास पटला असता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

भाजप सरकार अपयशी

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ओबीसी आरक्षणाचे प्रकरण कोर्टात सुरू होते. त्यावेळी तत्कालीन भाजपच्या सरकारने काय केलं तर यामध्ये तत्कालीन भाजप सरकार अपयशी ठरले असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

अंमलबजावणी आघाडी सरकार करणार

आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आघाडी सरकार करत आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

भाजप सरकार अपयशी

न्यायालयात साक्षीपुरावे करत असताना इंपिरिकल डाटा, अहवाल किंवा ट्रिपल टेस्ट करण्यासंदर्भात तत्कालीन भाजप सरकारने काय केले तर काहीच नाही म्हणून तर आमच्या सरकारच्या काळात निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आघाडी सरकार काम करत आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें