मुंबईतल्या मध्यमवर्गाची अशी अवस्था… आई भीक मागू देत नाही आणि… मांजरेकरांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
आज कशी आहे मुंबईतल्या मध्यमवर्गाची अशी अवस्था? आई भीत मागू देत नाही आणि वडील... महेश मांजरेकरांच्या 'त्या' प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट उत्तर..., सध्या सर्वत्र ठाकरे बंधू यांच्या मुलाखतीची चर्चा...

गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखरे राज्याच्या राजकारणात आलाच. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज्यातील राजकारणीची समिकरणं पूर्णपणे बदलली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर दोघांनी एकत्र मुलाखत दिली. यावर त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल अनेक मुद्दे मांडले. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत या दोघांनी ठाकरे बंधूची मुलाखत घेतली आहे. यामध्ये मांजरेकर यांनी मुंबईतील मध्यमवर्गींबद्दल मुद्दा उपस्थित केला.
मांजरेकर म्हणाले, आई भीक मागू देत नाही, वडील चोरी करु देत नाहीत… अशी परिस्थिती मुंबईतील मध्यमवर्गाची आहे… त्यांचं काय? फुटपाथ नाहीत, लोक चालणार कुठे? शाळांचे प्रॉब्लेम आहेत. फक्त श्रीमंतांना शिक्षण घ्यायचा अधिकार आहे का? महापालिका शाळाही एसी झाल्या पाहिजेत… असा मुद्दा मांजरेकर यांनी उपस्थित केला…
मांजरेकरांच्या प्रश्नावर वस्तुस्थिती अशी नाही म्हणत, उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी याबद्दल ठामपणे सांगू शकेन… मुंबई महापालिकेच्या शाळा आपण जेवढ्या सुधरवल्या तेवढ्या कदाचित फक्त अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सुधरवल्या असतील…’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी लोकांची रांग लागली.. याचं कारण आपण शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे… इमारती अजून सुधरवायला पाहिजेत, कारण शेवटी बजेटचा विषय असतो…’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मी म्यूनिसिपाल्टीच्या शाळेत जातो असं म्हणायला कोणाला लाज वाटता कामा नये – महेश मांजरेकर
मांजरेकरांच्या या प्रश्नाचं उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या शाळांची वस्तूस्थीती सांगितली. ‘लाज कोणालाच वाटणार नाही, तर अभिमान वाटेल… एअर कंडिशन्ड शाळा नाहीत, पण 2010 पासून अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा वापरण्यास मुंबईत सुरुवात झाली… व्हच्युअल क्लासरुम ही संकल्पना सुरु केली. हे म्हणजे ‘मन की बात’ नाही. येथे विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. महापालिकेच्या जवळपास 1300 शाळा मुंबईत आहेत. ज्यामध्ये साडेतील लाख विद्यार्थी वेगवेगळ्या आठ भाषांमध्ये शिक्षण घेत आहेत. मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी, हिंदी, ऊर्दू, गुजराती अशा आठ भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं.’
‘2014 – 2015 मध्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थांसाठी ई – लर्निंग संकल्पना आणली. ज्यामुळे मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं. अनेक गोष्टी ऍनिमेशनच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या, त्याचा परिणाम देखील दिसून आला… महापालिकेच्या शाळांचा रिझल्ट जवळपास 100 टक्क्यांच्या जवळ आला… पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळांमध्ये ऍनिमेशन पाहिजे म्हणून चिट्ट्या मागायला लोक यायल लागले…’ एवढंच नाही तर, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई सगळे अभ्यासक्रम आपण महापालिकेच्या शाळेत आणले… असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
