Malegaon Bomb Blast : मोठी बातमी! आरोपींवर UAPA लावणे अयोग्य, एनआयए विशेष कोर्टाचे काय निरीक्षण
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींवर युपीए लावणे चुकीचे असल्याचे निरीक्षण एनआयएच्या विशेष न्यायालयाने नोंदवले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. NIA च्या विशेष न्यायालयाने याप्रकरणात निकालाचे वाचन केले आहे. आरोपींविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आरोपींविरोधात लावलेला युएपीए हा योग्य नसल्याचे मुख्य निरीक्षण विशेष न्यायालयाने व्यक्त केले. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
न्यायालयाचे मुख्य निरीक्षण
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकालाचे वाचन सुरू आहे. दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने मांडला. बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही असं कोर्टाने म्हटलंय. आधी नाशिक पोलीस नंतर एटीएस आणि नंतर एनआयए अश्या यंत्रणांनी तपास केलेला आहे. बॉम्बस्फोटानंतर तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.बोटांचे ठसे सापडले नव्हते.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला नाही. नंबर प्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. तो आढळला नाही. आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावाही तपास यंत्रणांना आढळला नाही याप्रकरणाचा कट शिजला असे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे रेकॉर्डवर नाहीत. मोबाईलमधूनही फार काही पुरावे आढळले नव्हते.
साध्वीच्या नावाने बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता. एटीएस काळाचौकी हे पोलीस स्टेशन न्हवते असा आरोपींचा दावा. कोर्टाने ते नाकारलं आहे. मोटरसायकलमधून हा बॉम्बलस्ट झाला होता. 29 सप्टेंबरला साडेनऊ वाजता बॉम्ब स्फोटा झाला होता. मोबाईलमधूनही फार काही पुरावे आढळेल न्हवते. मोक्का लावणे चुकीचे होते म्हणून एनआयएने तो रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता. मोक्का हटवण्यात आला. युएपीए लागला तोही योग्य नव्हता असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले. युएपीएचे 16 आणि 17 ही कलमं लावल्या जाऊ शकत नाही असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले.
