‘मातोश्री’मध्ये जाण्यासाठी आक्रमक, माथेफिरु तरुणाचा गोंधळ, जेसीबीवर दगडफेक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर एका युवकाने गोंधळ (Man creates ruckus outside Matoshree) घातला.

'मातोश्री'मध्ये जाण्यासाठी आक्रमक, माथेफिरु तरुणाचा गोंधळ, जेसीबीवर दगडफेक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर एका युवकाने गोंधळ (Man creates ruckus outside Matoshree) घातला. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा तरुण मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला रोखल्यानंतर त्याने प्रचंड राडा केला. (Man creates ruckus outside Matoshree)

सकाळी साडेदहाच्या सुमारास या युवकाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत त्याचे वडील होते. माझं नाव संकेत पाटील आहे असं हा तरुण सांगत होता. इथे पोलिसांचा बंदोबस्त होता. या प्रवेशद्वारातून आत जाऊन त्याला ठाकरे कुटुंबाला भेटायचं होतं, मात्र का भेटायचंय हे सांगत नव्हता. त्याच्या तोंडावर मास्क नव्हता, मात्र तरीही तो सातत्याने मला आत जायचंय असं म्हणत होता. पोलिसांनी त्याला अडवलं आणि नंतर त्याने हंगामा केला.

कलानगरबाहेर रस्त्याचं काम सुरु आहे, तिथे असणाऱ्या जेसीबीवर कर्मचारी काम करत होते. मात्र या माथेफिरु युवकाने त्या जेसीबीवर दगडफेक करुन आपला राग काढला. इतकंच नाही तर त्याने जेसीबी चालकाला मारहाण करुन, जेसीबीच्या काचा फोडल्या.

या युवकाला आवरणं पोलिसांना कठीण जात होतं, कारण युवकाचं मानसिक संतुलन बिघडलं असावं आणि नेमकं काय सांगायचं आहे तेच कळत नव्हतं. पोलिसांनी त्याला कसोशिने समजवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

तो युवक आधी सांगत होता मी वांद्र्यातच राहतो, मग सांगत होता अंधेरीत राहतो. अखेर पोलिसांनी गाडी बोलावून त्याला अक्षरश: त्या गाडीत कोंबलं आणि जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले. हा प्रकार सकाळी साडे दहा ते 11 पर्यंत सुरु होता.

(Man creates ruckus outside Matoshree)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI