Tree Collapse | सहजा सहजी न पडणारं झाड पडलं, बँकेसमोर उभे असलेल्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी

ऐरोलीतील अभ्युदया बॅंकेजवळ झाड पडून जखमी झालेले ऐरोली गावातील बळीराम पाटील गंभीर जखमी झाले होते.

Tree Collapse | सहजा सहजी न पडणारं झाड पडलं, बँकेसमोर उभे असलेल्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Nupur Chilkulwar

|

Jul 07, 2020 | 6:17 PM

नवी मुंबई : ऐरोलीत झाड पडून एकाचा मृत्यू झाला (Man Died Due To Tree Collapse) आहे. ऐरोलीतील अभ्युदया बॅंकेजवळ झाड पडून जखमी झालेले ऐरोली गावातील बळीराम पाटील गंभीर जखमी झाले होते. सोमवारी (6 जुलै) रात्री त्यांचा मृत्यू झाला. बळीराम पाटील हे ऐरोलीतील प्रत्येक उत्सवात नेहमी पुढाकार घेणारे आणि आगरी कोळी महोत्सवातील सक्रिय सदस्य होते. त्यांच्या जाण्याने ऐरोली ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे (Man Died Due To Tree Collapse).

सोमवारी दुपारी ऐरोली सेक्टर-16 येथील अभ्युदया बॅंकेजवळ अचानक झाड कोसळून 3 जण जखमी झाले होते. त्यातील दोघांना किरकोळ जखम झाल्याने ऐरोली सेक्टर-3 येथील इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर ऐरोली गावचे बळीराम पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नेरुळ येथील डी. व्हाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डोक्याला मुकामार लागून रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने त्यांचा रात्रीच मृत्यू झाला. याबाबत डी. व्हाय. पाटील रुग्णालयाकडून पाटील यांच्याकडून डिपॉझिटची मागणी सुद्धा केल्याची माहिती आहे (Man Died Due To Tree Collapse).

हेही वाचा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

याबाबत उद्यान विभागाचे अधिकारी प्रशांत उरणकर यांच्याशी संपर्क केला असता, पावसाच्या आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे न पडण्यासारखे झाड पडले. ऐरोलीतील सेक्टर 16, 15, 19, 20 मधील झाडे छाटणीचे काम सतत सुरु असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी ऐरोलीत ठिकठिकाणी 4 झाडे कोसळली. ऐरोली सेक्टर 5 ते दिवगांव सर्कल येथील मुख्य रस्त्यावरील अनेक झाडांची मोठया प्रमाणात वाढ झाली आहे तर काही तुटण्याच्या तयारीत आहेत.

अशी बऱ्याच ठिकाणची झाडे वाढली असून पावसाळ्यापूर्वी त्यांची छाटणी गरजेची होती. परंतु अद्याप काही ठिकाणच्या झाडांची छाटणी करण्यात आलेली नाही. नवी मुंबई महानगर पालिकेने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर झाडांची छाटणी करावी. अन्यथा आशा गंभीर घटना घडल्यास कोण जबाबदार? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक करीत आहेत (Man Died Due To Tree Collapse).

संबंधित बातम्या :

Leptospirosis | मुंबईत कोरोनानंतर आता लेप्टोचा धोका, नेमकी लक्षणं काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें