AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rummy : ‘मी विरोधकांना कोर्टात खेचणार’, रमी प्रकरणानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे संतापले; अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा

Manikrao Kokate Rummy : रमी प्रकरणाने कृषीमंत्र्यांविरोधात राज्यात एकच काहूर उठले. विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना फैलावर घेतले.

Rummy : 'मी विरोधकांना कोर्टात खेचणार', रमी प्रकरणानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे संतापले; अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा
विरोधकांना कोर्टात खेचणारImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2025 | 11:02 AM
Share

defamation suit on Opposition : विधान परिषदेत कृषीमंत्री माणिककराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आरोपांची राळ उडवून दिली होती. राज्यभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर आज पत्रकार परिषद घेत कृषीमंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. आपण विरोधकांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विरोधकांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कोकाटे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात मुद्दामहून अशी कारस्थानं करण्यात असल्याचा सूर आळवला.

हा तर छोटा विषय

याबाबत मला एकच सांगायचं आहे की हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. मी खुलासा केला आहे. ऑनलाइन रमी काय माहीत आहे का. ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे, असा इशारा कृषीमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

15 सेकंदाचा व्हिडिओ

रमी नाहीच. माझी लक्ष्यवेधी होती तेव्हा. मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस करावा लागतो. किंवा फोन करावा लागतो. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. स्किप करणारा व्हिडीओ समोर आला नाही. मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही. दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला. पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देणार असल्याचे कोकाटे म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी करा

व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. सभापती त्याची चौकशी करतील. त्यात काही नाही. ज्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेच्या भावना दुखावतील. मी वेडंवाकडं काही केलं नाही. शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या. दोषींचे सीडीआर चेक करा. जे कोणी भाग घेतला ते समोर येऊ द्या. कृषी मंत्री म्हणून वारंवार समोर आणलं जातं, त्याची चौकशी करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार. तुम्ही राज्यभर माझी बदनाम केली. तुम्ही अशी कशी एखाद्या मंत्र्याची बदनामी करता. चौकशीत जे असेल ते सत्य बाहेर येईल. कोण कोण नेते कोणा कोणाशी बोलतात याचा सीडीआर काढण्याची विनंती करणार आहे. माझ्याबाबतीत असा इतिहास आहे की माझ्याविरोधात चुकीचे असे काही सापडलेले नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश